नगर खबर : नगरच्या २ महिलांना कोल्हापूरमध्ये रंगेहाथ पकडले.
चोर कशाप्रकारे चोरी करेल सांगता येत नाही किंवा चोर कोण असेल हे देखील सांगता येत नाही. मुले, मुली, तरुण, तरुणी, महिला, पुरुष गट यापैकी कोणीही चोर असू शकतो. आणि आपण ते सहसा ओळखू शकत नाही. ही घटना घडली आहे कोल्हापूरमध्ये. कोल्हापूरची आई अंबाबाई ही अवघ्या महाराष्ट्राचे दैवत आहे हे आपण सगळे जाणून आहोतच. त्यामुळे या कोल्हापूरमध्ये आई अंबाबाईचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून भक्तगण येत असतात.
आई अंबाबाईचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी असते. आणि या गर्दीमध्ये काही चुकीचे लोक देखील असतात. हे चुकीचे लोक घुसणारी दुसरी तिसरी कोणी नसून चोरी करण्याच्या उद्देशाने आलेले चोरटे असतात. असाच प्रकार या कोल्हापूरच्या आई अंबाबाई येथील मंदिरामध्ये घडला आहे. अशीच एक घटना सीसीटीव्हीच्या माध्यमातून समोर आली आहे. या सीसीटीव्ही मध्ये दोन महिला या चोरी करत असतात. आणि चोरी करत असताना या महिलांना नियंत्रण कक्षाच्या पथकाने रंगी हात पकडले. या दोन्ही महिला मूळच्या बार्शी येथील राहणारे आहेत. सध्या त्यांचे वास्तव्य हे नगर येथील आहे. सरिता अमोल शिंदे व तेजस्विनी उगले असं चोरी करणाऱ्या त्या दोन महिलांचे नाव आहेत.
देवस्थान म्हटलं की गर्दी आली आणि गर्दी असेल तर नियंत्रण करण्यासाठी देवस्थान सीसीटीव्ही लावत असतात. व त्याप्रमाणे देवस्थानची नियंत्रण समिती देखील असते. जी नियंत्रण समिती या गर्दीतील लोकांवर नागरिकांवर लक्ष ठेवून असते. कारण यामध्ये चोरी करण्याच्या उद्देशाने आलेल्या व्यक्तींचा देखील समावेश असू शकतो. आणि जर असे कोणी चोरी करणारे व्यक्ती सापडले तर त्यांना पोलिसात देखील दिले जाते. पण काही वेळेस पोलिसांच्या निव्वळ उजवी कारवाईनंतर चोरी करणाऱ्या महिला किंवा पुरुष यांच्या वर्तनामध्ये बदल होत नसतो. आणि पुन्हा पुन्हा वारंवार असा प्रकार घडत असतो आणि अशीच घटना या सीसीटीव्ही फुटेज मध्ये दिसून आली आहे.
दर्शनासाठी आलेल्या महिलेच्या पर्समध्ये हात घालून चोरी करताना या दोघी दिसून आल्यावर अवघ्या पाच मिनिटाच्या आतच त्या दोघींना ताब्यात घेण्यात आले. आता पोलीस पथकाकडून त्यांच्यावर काय कारवाई केली जाईल याकडे समस्त कोल्हापूरकरांचे लक्ष लागू राहिले आहे. अभिजीत पाटील यांच्या कर्तव्य दक्षतेमुळे अवघ्या पाच मिनिटांमध्ये या दोन नगरच्या महिलांना पकडण्यामध्ये यश आले आहे. या चोरी करणाऱ्या दोन महिलांना देवस्थान समितीने जुना राजवाडा पोलीस ठाणे यांच्याकडे सुपूर्द केले आहे. व पुढील गुन्ह्याची प्रक्रिया सुरू आहे.