ऐकावं ते नवलच ! दोन महिलांनी एकमेकांच्या पती विरोधात बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल केलेला आहे.
ही घटना आहे मध्यप्रदेश मधील ग्वाल्हेर या ठिकाणची, ग्वाल्हेर येथील भागात राहणाऱ्या एका महिलेने पोलीस स्टेशन मध्ये जाऊन एक तक्रार दाखल केली आणि त्या तक्रारी मध्ये ती असं म्हणते की,” मी घरात एकटी होते आणि त्याच वेळेस माझ्या पतीचा मित्र आणि त्याचा आणखी एक साथीदार माझ्या घरी आले. आणि मला सांगितले की माझ्या पतीचा अपघात झालाय आणि त्याला दवाखान्यामध्ये दाखल केले आहे.” आणि हे ऐकून ती महिला आपल्या पतीच्या मित्रासोबत भयभीत होऊन निघून गेली आणि त्या पतीच्या मित्राने निर्जनस्थळी नेऊन त्यांची मोटरसायकल थांबवली. काहीतरी बहाण्याने त्या महिलेला सिमरिया टेकरी या ठिकाणी घेऊन गेला आणि त्याने आणि तिच्या पतीच्या मित्राने तिच्यावर बलात्कार केला.
त्या महिलेच्या पतीच्या मित्रासोबत असलेल्या अन्य व्यक्तीने सुद्धा बलात्कार करण्याचा प्रयत्न केला, पण तेव्हा त्या महिलेने मोठ्याने आरडाओरड केली. आणि तिच्या आरडाओरड करण्याने ते दोन्ही आरोपी तिथून पळून गेले. त्यानंतर महिलेने पोलिस स्टेशन गाठून पतीच्या मित्राची तक्रार दाखल केली. त्यावरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला. यानंतर सदर महिलेने ज्या आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला होता, त्याच्या पत्नीनेही पोलीस स्टेशन मध्ये तिच्या पतीच्या मित्राच्या म्हणजेच पिडीत महिलेच्या पतीवर गुन्हा दाखल केला. त्या आरोपीच्या पत्नीने असे सांगितले की, ती देखील घरात एकटी होती आणि पीडित महिलेचा पती तिच्या घरी आला आणि पीडित महिलेच्या पतीने आरोपी मित्राच्या बायकोवर घरात घुसून जबरदस्तीने तिच्यावर बलात्कार केला आणि तिचे नग्न फोटो देखील काढले आणि ते फोटो दाखवून तो ब्लॅक मेल देखील करत होता आणि आरोपीच्या पत्नीच्या तक्रारीवरुन पोलिसांनी पिडीतेच्या पती विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.
अशाप्रकारे दोन्ही महिलांनी आपल्या पतीच्या मित्राविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे असा अजब-गजब प्रकार घडला आहे मध्य प्रदेश मधील ग्वाल्हेर ठिकाणी, तर पाहूया पुढे पोलीस यावर काय कारवाई करणार आहे.