‘पीएफआय’ च्या दोन कार्यकर्त्यांना ” या ” जिल्ह्यातून घेतले ताब्यात; पोलिस अधीक्षकांची माहिती.

काही दिवसांपूर्वीच पीएफआयच्या कार्यलयांवर देशभरात छापेमारी झाली होती. जवळपास १०० जणांना अटक करण्यात आली होती. औरंगाबाद एटीएस आणि पोलिसांनी मोठी कारवाई करत पीएफआयचे आणखी १३ ते १४ कार्यकर्ते ताब्यात घेतले होते. एकाच वेळी पीएफआयच्या कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली होती. पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI) या इस्लामी संघटनेच्या कार्यरत असलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील दोघांना आज (मंगळवारी) पहाटे ताब्यात घेतल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिली.
राष्ट्रीय तपास यंत्रणा आणि राज्य दहशतवादविरोधी पथकाकडून (ATS) पॉप्युलर फ्रंट ऑफिस इंडिया (PFI) संघटनेशी ठिकाणांवर छापे टाकण्यात आले आहे. मंगळवारी रात्रीपासून पीएफआय संघटनेशी संबंधित अनेक ठिकाणावर छापेमारी सुरू केली आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) मागील आठवड्यात महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि राजधानी दिल्लीसह ११ राज्यांमध्ये धाडसत्र सुरू केले आहे. यादरम्यान, तपास यंत्रणेने पॉपुलर फ्रंट ऑफ इंडिया (PIF) च्या कार्यालये व सदस्यांवर धाडी टाकल्या. विविध राज्यातून १०६ लोकांना अटक केली आहे. महाराष्ट्र, केरळ आणि कर्नाटकात सर्वाधिक कार्यकत्यांना अटक झाली आहे.
नगर शहरातून संघटनेशी निगडित असलेल्या जुबेर आणि संगमनेर मधून सदस्य असलेल्या मौलानाला ताब्यात घेण्यात आले आहे. या तिघांनाही स्थानिक न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याचे पोलिस सूत्रांकडून सांगण्यात आले.
पीएफआयवर देशात हिंसाचार भडकवणे, दहशतवादी हल्ले करणे, दंगे भडकवणे आणि टेरर फंडिंगसारखे गंभीर आरोप आहेत. पीएफआय संघटनेचे डी कंपनीसोबतही कनेक्शन उघड झाले आहेत.