दसरा मेळावा करण्यासाठी शिवाजी पार्क मिळावे यासाठी बरीच धडपड करावी लागली असताना त्यात दसरा मेळावा शिवाजी पार्कवर घेण्यासाठी शिवसेनेला उच्च न्यायालयाकडून परवानगी मिळाली असली तरी त्यांच्या अडचणी मात्र काही कमी होत नाहीयेत. शिवसेनेच्या चिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालयाने नुकताच दिलेल्या निर्णयानंतर उद्धव ठाकरेंना आणि शिवसेनेला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. कारण दसऱ्यापूर्वीच शिंदे गट हा उद्धव ठाकरेंचा ‘उजवा हात’ समजला जाणाऱ्या मिलिंद नार्वेकर यांना आपल्या गटात घेणार असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे.
याबाबत शिंदे गटातील मंत्री गुलाबराव पाटील यांनी मिलिंद नार्वेकर लवकरच शिंदे गटात रुजू होणार असल्याचा दावा करून खळबळ उडवून दिली आहे. महाराष्ट्रात पहिले सत्ता गमावणे आणि हळूहळू आपल्या पक्षाची वाताहात होत असल्याचे उद्धव ठाकरे यांना पाहावं लागत आहे. आणि त्यांच्या अडचणीत बरीच वाढ झाली आहे. तरीही उद्धव यांनी विरोधकांवर बोचऱ्या शब्दात टीका ही सुरुच ठेवल्या आहे. एकनाथ शिंदे आणि भाजपविरोधात ते सातत्याने आक्रमक भूमिका घेत असतात. दुसरीकडे, शिंदे गट या सगळ्यावर बोलण्याऐवजी उद्धव ठाकरेंचा गट सातत्याने फोडण्याचा प्रयत्न करत आहे.
याचवेळी अचानक शिंदे सरकारमधील मंत्री गुलाबराव पाटील यांनी असा एक दावा केला आहे आहे की, ज्यामुळे मातोश्रीला देखील मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरेंचे सचिव मिलिंद नार्वेकर हे लवकरच शिंदे गटात सामील होणार असल्याचे त्यांनी नुकतेच आपल्या एका भाषणात सांगितले आहे.
गुलाबराव पाटील यावेळी असं म्हणाले की, ‘मिलिंद नार्वेकरही आपल्याकडे येत असल्याची चर्चा सुरू आहे.’ यावेळी गुलाबराव पाटील असंही म्हणाले की, पुढच्या काळात उद्धव ठाकरेंकडे आता जे 15 आमदार आहेत त्यापैकी 5 आमदारही त्यांच्याकडे राहणार नाही. आता फक्त आमच्याकडे धनुष्यबाण चिन्ह येणं तेवढं बाकी आहे.