कोलकत्यात पार पडला अनोखा विवाहसोहळा, संगीत हळद पासून मेहंदीपर्यंत सर्व कार्यक्रम पडले पार.
आपण लग्नाची बरेच प्रकार बघितले आहेत. लव मॅरेज, अरेंज मॅरेज, एखाद्या वस्तू सोबत केलेले लग्न, एखाद्या प्राण्यांसोबत केलेले लग्न किंवा दोन प्राण्यामधील लग्न हे आपल्याला नवीन नाही आजकालचा जमाना हा मॉडल जमाना आहे. यामध्ये कोण काय करेल सांगता येत नाही. आपण काही दिवसापूर्वी एक बातमी पहिली होती ज्यामध्ये एका तरुणीने स्वतःशीच लग्न केला आहे. या घटनेला महिना होतो ना होतो तेच आता एक नवीन घटना समोर येत आहे. प्रेमात आणि युद्धात सर्व काही माफ असतं. असं बोललं जातं आणि याची प्रचिती अनेकदा आपल्याला येत असते. एका मुलाचे मुली वरती प्रेम असणे किंवा एका मुलीचे मुलावरची प्रेम असणे इथपर्यंत आपण ऐकले किंवा पाहिले आहे. पण कलकत्त्यामध्ये एक अशी घटना घडली आहे की, या ठिकाणी चक्क दोन पुरुषांनी एकमेकांसोबत विवाह केल्याची घटना समोर आली आहे.
यामध्ये त्या दोघांची नावे अभिषेक व चैतन्य अशी आहेत. या दोघांनी नुकताच विवाह केला आहे. हे दोघं एकमेकांच्या आयुष्याचे जोडीदार झाले आहेत. आणि त्यांच्या या लग्नाचे फोटो सध्या सोशल मीडिया वरती भरपूर प्रमाणामध्ये व्हायरल होत आहेत. या विवाह मध्ये अभिषेक हा कलकत्त्यामध्ये डिझायनर आहे व त्याने त्याच्या खास मित्रासोबत लग्न केला आहे.
आणि हे लग्न त्यांनी लपवणूक न करता केले आहे. या दोघांचे लग्न कलकत्त्यामधील एका फाइव स्टार मध्ये अगदी थाटामाटात पार पडले आहे. आणि यांच्या लग्नामध्ये संगीत सोहळा, हळद, अगदी मेहंदी पर्यंतचे सर्व विधी पूर्ण करण्यात आले आहेत. आणि महत्त्वाचा भाग म्हणजे या विवाह सोहळ्यामध्ये दोघांच्याही घरचे उपस्थित होते या दोघांच्याही कुटुंबांनी त्या ठिकाणी उपस्थित राहून त्या दोघांना आनंदाने नवविवाहित जोडप्याला आशीर्वाद दिला.
अभिषेक व चैतन्य हे दोघे गे असून यांच्या हळदीचे व लग्न समारंभाचे फोटो व व्हिडिओ इंस्टाग्राम वर शेअर केले गेले आहेत. यामध्ये अभिषेकने पारंपरिक बंगाली धोती व कुर्ता घातला आहे व चैतन्याने शेरवानी घातली आहे. या दोघांच्या लग्न सोहळ्याचे फोटो सध्या सोशल मीडिया वरती तुफान व्हायरल होत आहेत. त्याचप्रमाणे लोकांनीही यांच्या दोघांच्या लग्न सोहळ्याला नकारात्मक भूमिका न घेता त्यांच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. व सोशल मीडियावर लोक या जोडप्यांचे अभिनंदन करत आहेत. हे दोघेही लग्न करून किती आनंदी आहेत हे त्यांच्या असलेल्या फोटो वरून समजून येते. असं असलं तरी भारतातील हा पहिला समलिंगी विवाह झाला आहे असं नाही. याआधी देखील भारतातील पहिला समलिंगी विवाह 2017 मध्ये झालेला आहे. त्याचप्रमाणे डिसेंबर मध्ये देखील याची पुनरावृत्ती झाली हैदराबाद मध्ये एक समलिंगी जोडप्याने लग्न गाठ बांधली होती. आणि आता चैतन्य व अभिषेक यांनी देखील कलकत्त्यामध्ये लग्न समारंभ पार पाडला आहे.