खामगांव- केशवनगर येथे सुरुवातीला गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून गुरु पूजन करण्यात आले.
यावेळी गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने नुकतेच उपशिक्षणाधिकारी पदी निवड झाल्याबद्दल कु.शारदा कैलास सरजने यांचा जेष्ठ साहित्यिक तथा सामाजिक कार्यकर्त्या, शिक्षण विस्तार अधिकारी, पंचायत समिती खामगाव,वनश्री ऊर्मिलाताई ठाकरे यांचे हस्ते यथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी जनुना सरपंच सौ सुवर्णा गोरे ह्या प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होत्या.
बुलडाणा जिल्हा,खामगाव तालुक्यामधील चिंचपूर या खेड्यातीलअतिशय, मेहनती, सुस्वभावी अभ्यासू व कुशाग्र बुद्धीची…वयाच्या 24 व्या वर्षी कु.शारदा सविता कैलास सरजने ह्यांची नुकतीच MPSC राज्य सेवा मधून उपशिक्षणाधिकारी पदी निवड झाली आहे. पहिल्याच फेरीत त्या ही परीक्षा पास झाल्या आहेत. त्यामुळे त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
अतिशय जेमतेन परिस्थितीतून आई वडिलांनी कु.शारदा यांचे शिक्षण पूर्ण केले.वडिल चिंचपूर येथे पोस्टमन आहेत तर आई गृहिणी आहे. कु.शारदा सरजने यांचे शालेय शिक्षण नवोदय शेगाव इथे तर IISER पूणे येथून BSMS ची डिग्री पूर्ण केलेली आहे. यावेळी सौ.सविता सरजने, गीता सरजने, संपूर्ण सरजने परिवार, श्री.संदीप गॊरे,सौ. उषाबाई वाघमारे, श्री. गजानन कोळसे,श्री.विजय मनसुबे, अतुल कळमकार, आदि कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्री.अमोल गोरे यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री.मनोज सुडोकार यांनी केले.कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी विलास गोरे, मधुकर डवंगे,चंद्रकांत हरमकार, दत्तात्रय धाडकर यांनी अथक परिश्रम घेतले.