व्हायरल : ST समोर कंडक्टर ने केले असे काही ज्याने सगळ्यांच्या भुवया उचावल्या.
काही दिवसापूर्वी महाराष्ट्र राज्यातील राज्य परिवहन महामंडळ दीर्घकाळ चाललेल्या संपामुळे प्रचंड चर्चेमध्ये आले होते. मुंबईमध्ये आंदोलनकर्त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर देखील मोर्चा काढला होता. या मोर्चामुळे आंदोलनाला वेगळी दिशा मिळाली होती. आणि काही दिवसांनी ही लाल परी टप्प्याटप्प्यांनी राज्यातील रस्त्यावर दिसू लागली. राज्य परिवहन महामंडळाच्या बस महाराष्ट्रातील प्रत्येक रस्त्यावर दिसू लागले.
गाव तिथे बस घेऊन जगणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाचे कंडक्टर सीबी जाधव यांचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणामध्ये व्हायरल होत आहे. जाधव हे सेवानिवृत्त झाले आहेत. आपल्या सेवेतील शेवटचा दिवस असताना त्यांनी लाल परी म्हणजे राज्य परिवहन महामंडळाच्या बस समोर बसून तिच्यासमोर हात जोडून कृतज्ञता व्यक्त करताना जाधव यांचा फोटो प्रचंड प्रमाणामध्ये व्हायरल झाला आहे.
सोशल मीडियावर ज्या वाहक जाधव यांचा फोटो व्हायरल झाला आहे, ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्यातील बस स्थानकातील असल्याचा स्पष्ट केले गेले आहे. जाधव हे त्या बस समोर नतमस्तक झाले हे आपल्याला पहायला मिळत आहे. आणि त्या बसवर अरोंदा वेंगुर्ला अशी पाटी लावलेली दिसत आहे.
वाहक सी.बी. जाधव हे वेंगुर्ला बस स्थानकात सेवा बजवणारे असून काही दिवसापूर्वी ते निवृत्त झाले आहेत. ज्या दिवशी ते निवृत्त झाले त्या दिवशी त्यांनी भाऊक होत ज्या बसने किती वर्षे आपल्याला सांभाळले आहे, जिच्या जीवावर आपला उदरनिर्वाह, आपलं घर, संसार चालत होतं त्या निर्जीव बस विषयी असणारी कृतज्ञता व्यक्त करताना वाहक जाधव भाऊक होऊन तिच्यासमोर नतमस्तक होत आहेत.
त्यासोबतच ते बस समोर हात जोडून बस विषयी आपली कृतज्ञता व्यक्त करताना आपल्याला दिसत आहे. कंडक्टर सी.बी. जाधव यांचा हा नतमस्तक होत असतानाचा फोटो सध्या सोशल मीडियावर चांगल्या प्रकारे व्हायरल झाला आहे. या फोटोची दखल हिंदी माध्यमांनी देखील घेतली आहे.
आपल्या महाराष्ट्रामध्ये लालपरीने आपण लांब लांब प्रवास केला आहे. कंडक्टर सी.बी. जाधव यांचा नतमस्तक होत असताना तर फोटो अनेक जणांनी त्या फोटोला भावनिक कॅप्शन देत पुढे शेअर देखील केला आहे.
या फोटो मधून कंडक्टर जाधव यांची कामावरची निष्ठा, किती प्रामाणिक आहे त्या गोष्टीविषयी जाधव किती आदर, आपुलकी दाखवत आहेत हे आपल्याला दिसते. मग ती वस्तू जिवंत असो किंवा निर्जीव त्यासमोर जाधव यांच्यासारखं नतमस्तक होताना आपल्या हातही सहज जोडले जातात हेच या फोटोतून दिसत आहे.