व्हायरल : एका पोलिसाची इंजेक्शन घेताना हवा टाइट होते, आणि तो लहान मुलासारखा रडू लागतो..!!
इंजेक्शन घ्यायचं म्हणलं की, सगळ्यांनाच त्याची भीती वाटत असते. इंजेक्शन बाबतीत भीती सर्वात जास्त ही लहान मुलांना असते. दवाखाना हा शब्द जरी ऐकला तरीही लहान मुलं घरात लपून बसतात. किंवा घरातून त्यांना दवाखान्यात घेऊन जायचं हे कळलं तरी मोठ्या मोठ्याने रडायला चालू होतात. असंच काही बाबतीत मोठ्या माणसांसोबत देखील घडत असतं पण चक्क या बातमीमध्ये इंजेक्शन घेण्यासाठी एक पोलीस घाबरला आहे.
हे पोलीस वयस्कर असून देखील लहान मुलासारखे रडत आहेत. या बातमीमध्ये तुम्हाला आश्चर्य वाटेल एक पोलीस इंजेक्शनच्या भीतीने लहान मुलासारखा मोठे मोठे रडू लागला आहे. आणि तो इतका घाबरला आहे की, त्यांन अगदी लहान मुलांसारखं मोठ्याने भोकड पसरला आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणामध्ये व्हायरल होत आहे.
असं म्हटलं जातं की, पोलिसांना कशाचीच भीती नसते. छाती ताणून ते गुन्हेगारांच्या छातीवर गोळ्या झाडत असतात. पण या व्हिडिओने पोलिसांबाबतीत सर्वांनाच धक्का दिलाय, यामध्ये कुणावर गोळ्या झाडन सोडा, आपलं ब्लड सॅम्पल देण्याच्या विचारानेच हवा टाईट झाली आहे. जेव्हा ब्लड सॅम्पल घेण्यासाठी पोलिसाला बसवलं जातं, तेव्हाच तो थरथर कापू लागतो. बसवल्यानंतर ब्लड सॅम्पल घेतला जात होतं, अगदी त्यावेळी त्याने तांडव चालू केलं आणि इंजेक्शन शरीरामध्ये घुसवतात तो मोठ्या मोठ्या किंचाळू लागला.
सदरील व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, यामध्ये पोलिसांसाठी एक कॅम्प लावण्यात आला आहे. ज्यामध्ये पोलिसांची ब्लड टेस्ट केली जाणार आहे. एक पोलीस ब्लड सॅम्पल देण्याआधीच थरथर कापतो. दुसरा पोलीस त्याला धरून खुर्चीवर बसतो. अशा वेळेस त्या ब्लड सॅम्पल देणाऱ्या पोलिसाला घाम फुटल्याचा त्याच्या चेहऱ्यावर दिसत. आणि तो डॉक्टर समोर हातही जोडतो. त्यानंतर काय काय बडबड करून लागतो, विचित्र विचित्र आवाज काढू लागतो.
त्याला पकडण्यासाठीच तीन चार लोक होती, तर ब्लड सॅम्पल देण्यासाठी या पोलिसांनी एवढे नखरे केलेत की एवढं कोणतं लहान मुलंही करणार नाही. ब्लड सॅम्पल दिल्यानंतर तो पोलीस रडत राहतो आणि तो रडत आहे हे पाहून इतर पोलिसांना मात्र हसू फुटत आहे. या व्हिडिओला बऱ्याच कमेंट देखील आले आहेत. यामध्ये एक युजर कोणतं नशा करून आला आहेस ? तर एकाने तू काय गोळी खाणार ? असं विचारलं आहे.