व्हायरल व्हिडिओ: सकाळी दात कसे घासायचे याचा व्हिडिओ सध्या होतोय व्हायरल, व्हिडिओ नक्की पहा.
सकाळी उठल्यानंतर सर्वात महत्त्वाचं काम असते ते म्हणजेच व्यक्तिगत स्वच्छता करणे. त्यामध्ये आपले दात साफ करणं हे देखील मोठे काम असतं. दात साफ करण्याची नवीन आयडिया नवीन शक्कल काय आहे याचा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय.
हा व्हिडिओ पाहून तुम्हाला हसू आवरणार नाहीये, ट्विटर अकाउंटवरती हा व्हिडिओ शेअर झालेला आहे. एका व्यक्तीने अनोख्या पद्धतीने दात घासण्यासाठी शक्कल लढवली. सकाळी उठला उठला अर्धवट झोपेत असताना असा डोळे मिटुन दात घासण्याची सवय बऱ्याच जणांना असते. दात स्वच्छ करण्यासाठी हाताची मेहनत तर करावी लागते मात्र हात न हलवता दात स्वच्छ घासणे जवळ जवळ अशक्य आहे.
मात्र या व्हिडिओमध्ये हात न लावता दात स्वच्छ होतात कुठलीही मेहनत घेण्याची गरज नाहीये. दात घासण्याची मेहनत वाचवण्याचा जुगाड कसा केला पाहूयात या बातमीमध्ये. काही लोक दोन टाईम दात घासतात. सकाळी किंवा संध्याकाळी मात्र दात घासण्यासाठी असही काही होऊ शकतं या व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे. आपण दात घासण्यासाठी ब्रशचा वापर करतो मात्र या बहाद्दराने ब्रश आणि बंदूक या दोघांचाही वापर केला आहे. बंदुकीवर ब्रश फिट केला दात साफ करण्यासाठी तो बंदूकीचा ट्रीगर दाबलेला दिसत आहे ज्यामुळे ब्रश पुढे मागे सरकत आहे. अशा पद्धतीने आतल्या बाजूचे दात स्वच्छ करताना दिसतील.
या व्हिडिओमध्ये बंदूकीचा ट्रीगर चा आवाज देखील स्पष्टपणे ऐकू येतोय, की खरंच बंदूक चालवत आहे हा हैराण करणारे व्हिडिओ पाहून अनेकांनी प्रतिक्रिया दिल्यात. अनोख्या पद्धतीने एक व्यक्ती अगदी सहजपणे बंदुकीच्या साहाय्याने दात स्वच्छ करत आहे. मात्र प्रत्यक्षात आपण कुणीही असा प्रयोग करू नका एक मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. आणि त्यामुळेच तुमच्यापर्यंत गमतीशीर माहिती पोहोचावी यासाठी ही बातमी आहे.