Viral : श्वानाने मांजरीच्या लहान पिल्लांसोबत पहा काय केले, व्हिडिओ पाहून तुम्हालाही विश्वास बसणार नाही.
आई ही आई असते, मग ती कोणाची ही असो मानवाची असो किंवा प्राण्यांची असो. ममत्व हे प्रत्येक स्त्रीमध्ये असत. मानवाला बोलता येत त्यामुळे भावना व्यक्त करता येतात. मायने जवळ केलं तर रानाच पाखरू पण जवळ येत, आई आणि लेकरातील प्रेम हे इतर कुठल्याही प्रेमापेक्षा सर्वश्रेष्ठ आहे. मायेची फुंकर कुठल्याही समस्येला तोंड द्यायला बळ देते. आई लेकरातील असेच प्रेम प्राण्यांमध्येही पाहायला मिळते.
प्रेमाला प्रजातीचे बंधन नाही. ते सर्वांमध्येच सारखे असते, याचा अनुभव एका व्हिडिओतून आला आहे. व्हिडिओमध्ये एक मादी श्वान मांजरीच्या पिल्लांची काळजी घेत असल्याचे दिसून येत आहे. हा व्हिडिओ अनेकांना भावूक करत आहे. माजी भारतीय क्रिकेटर व्हिव्हिएस लक्ष्मण यांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये एक मादी श्वान मांजरीच्या पिल्लांची काळजी घेत असल्याचे दिसून येत आहे.
श्वान या पिल्लांची दूध देखील पाजत आहे आणि त्यांच्याकडे लक्ष ठेवत आहे. पण या पिल्लांची आई कुठे आहे, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर या पिल्लांची आई वारल्याचे व्हिव्हिएस लक्ष्मण यांनी आपल्या पोस्टमध्ये सांगितले आहे. हे दृश्य खरंच भावूक करणारे आहे.
श्वानाचा हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हिडिओला ५५ हजार व्हयूज मिळाले असून भरपूर लाइक्स मिळाले आहेत. व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनाही गहिवरले. एका युजरने, ‘मा के जैसा कोई नही’ असे म्हणत आईप्रति असलेले प्रेम व्यक्त केले आहे. तर एकाने व्हिडिओ मानवतेची जाण करून देत असून त्यापासून आपण काही शिकले पाहिजे असे म्हटले.