बायको मागच्या सीटवर बसलेली असताना या पाठ्याने पहा बुलेटवर काय केलं व्हिडिओ होतोय व्हायरल..
एका लग्न झालं की अनेक स्त्री आपल्या पतीला सर्वस्व मानतात आणि पतीच्या प्रत्येक कामात सोबत असतात , ही पत्नी तर आपल्या पतीच्या स्टंट मध्ये अर्धगिनी म्हणून भूमिका पूर्ण बजावली आहे.बरीच लोकं गाडी चालवताना अनेक विचित्र गोष्टी करत असतात. जसे की, ट्रॅफिक सिग्नलवर विनाकारण हॉर्न वाजवणे किंवा गाडी चालवताना हेडफोन वापरणे. एवढंच नाही तर दुचाकी भरघाव वेगाने चालवणे किंवा दुचाकीच्या मागे बसून चालकाला वेगाने गाडी चालवण्यास सांगणे.
यासारख्या गोष्टींमुळे अपघाताची शक्यता जास्त वाढते. असे स्टंट करणे कोणासाठीही धोक्याचे ठरू शकते. सध्या शोषल मिडीयावर असाच एक स्टंट व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक बाईकस्वार स्टंट करताना दिसत आहे, तर लाल साडी घातलेली त्याची पत्नी बुलेटच्या मागच्या सीटवर बसलेली आहे. हा माणूस बेधडकपणे स्टंट करत आहे आणि मागे बसलेल्या पत्नीच्या चेहऱ्यावर कोणतीही भीती दिसत नाही आहे.व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती हेल्मेटशिवाय रॉयल एनफिल्ड बुलेट चालवताना दिसत आहे.
तर मागे त्याची बायको बसलेली शांतपणे बसली आहे. यानंतर तो माणूस आपले दोन्ही पाय बाईकच्या सीटवर ठेवतो आणि नंतर हँडल सोडून बाईकवर उभा राहण्याचा प्रयत्न करतो. तो समतोल साधत चालत्या बाईकवर उभा राहतो. तर दुसरा एक व्यक्ती त्याचा हा संपूर्ण स्टंट शूट करतो. धोकादायक स्टंटमध्ये केवळ स्टंटमनच नाही तर त्याच्या मागे बसलेल्या पत्नीच्या जीवालाही धोका असतो.
तो सीटच्या वर उभा राहून स्टंट करत असताना, त्याची पत्नी बिनधास्तपणे मागे बसलेली दिसत आहे. तिच्या चेहऱ्यावर कोणत्याही प्रकारची भीती दिसत नाहीये. असे स्टंट जीवावर ही बेतू शकतात,त्यामुळे थोडे जपून रहा .