बर झाल ! शिवसेनेतली घाण गेली.
सध्या राजकीय घटनांनी राज्यातले वातावरण गढूळ होतांना आपल्याला दिसत आहे शिवसेनेचे मोठे नेते एकनाथ शिंदे यांनी की जो बंड केला आहे त्यामुळे शिवसेनेमध्ये फूट पडत चालली आहे पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मैदानात उतरले असून ज्या आमदारांनी बंडखोरी केली आहे त्यांच्यावर कडक कारवाई करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत त्याचप्रमाणे दुसरीकडे शिंदे गटाकडून पत्रकार परिषद घेण्यात आली व आपली बाजू मांडण्याचा त्यांनी प्रयत्न केला यामध्ये बोलताना ते म्हणतात की, ” शिवसेनेला आम्ही नाही तर राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाने हायजाक केले आहे.
यामध्ये युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी शिवसेनेच्या आमदारांवर खोचक टीका केली आहे. युवा सेनेचे प्रमुख म्हणतात की, गेल्या दोन चार दिवसापासून शिवसेनेमध्ये उत्साहाचं वातावरण आहे कारण आता शिवसेना मधली घाण निघून गेली त्यामुळे पुढे जे काही होईल ते चांगलं होणार आहे अशा शब्दांमध्ये युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी नाव न घेता टीका केली आहे.
ते पुढे बोलताना म्हणतात की, कार्यकर्त्यांमध्ये जोश उत्साह मी बघितला आहे तो बघितल्यानंतर मला तो दिवस आठवतो जेव्हा माझी उमेदवारी जाहीर केली होती. मी बोलत असताना सध्या माझा आवाज फक्त हॉलमध्ये जरी असला तरी तुमचा आवाज हा गुवाहाटी मधील त्या हॉटेलमध्ये पोहोचला आहे. त्याचप्रमाणे जाधव म्हणतात की मुंबई व मुंबई पालिकेवर सगळ्यांचा डोळा आहे आणि मुंबईवर जरी कुणाचा डोळा असला तरी मुंबईला कधी कुणाची नजर नाही लागू दिली अस आदित्य ठाकरे म्हणाले
‘ एका गोष्टीचं आश्चर्य वाटतं की राजकारण म्हटल्यानंतर लोक कशी काय बदलू शकतात आणि एक प्रश्न हा सतावतो की आम्ही लोकांना कधी काय कमी केलं ? काय नाही दिलं ? एवढं सगळं करूनही काही लोकांनी बंडखोरी केली पण यामुळे आपल्यातला बंडखोर कोण या कारणाने किमान स्पष्ट झाला. तसेच दोन चार दिवसापासून शिवसैनिकांमध्ये चे वातावरण आहे सगळीकडे जोश आहे त्याच प्रमाणे जल्लोष आहे यावरून स्पष्ट होते की शिवसेने मधून घाण निघून गेली आहे आणि आता यापुढे सर्व काही चांगलंच होणार ‘ असं आदित्य ठाकरे बोलताना म्हणाले.