असं घडल तरी काय ? कि ठाण्यात परप्रांतीय मच्छी विक्रेत्याला महिलांनी दिला चोप. पाहा बातमी सविस्तर.
काही वर्षापूर्वी परप्रांतीयामुळे मोठा वाद उफळत होता , कालाताराने यावर पडदा पडला , पण या मागे एक उद्देश होता ही जे स्थानिक आहेत यांना काम धंद्यामध्ये प्राधान्य मिळाव, यात मनसे आग्रणीय होते.असाच काहीसा प्रकार ठाण्यात घडला . एका महिलेने वैतागून एका परप्रांतीयची कॉलर धरत मारहाण केली , या महिलेचा दुर्गा अवतार पाहून अनेक जण आवक झाले.
ही घटना कळवा परिसरातील खारेगाव येथे घडली. स्थानिक आगरी कोळी विरुद्ध परप्रांतीय वाद समोर आला आहे. आगरी कोळी समाजातील मच्छी विकणाऱ्या महिलांनी एका परप्रांतीय मच्छी विक्रेत्याला चोप दिल्याची घटना घडली आहे. ‘बाहेरुन येवून मच्छी विकतो’ या कारणावरून स्थानिक कोळी महिलांनी या परप्रांतीय मच्छी विक्रेत्याला चोप दिला यावेळी या महिलेचा राग खूप अनावर झाला होता.
हा मारहाणीचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे.या परप्रांतीय मच्छी विक्रेत्यांना या आधी देखील ताकीद देण्यात आली होती. वारंवार सांगून देखील परप्रांतीय मच्छी विक्रेते ऐकत नसल्याने या आगरी कोळी महिलांनी परप्रांतीय मच्छी विक्रेत्याला चोप दिला आहे. तसेच या परप्रांतीय मच्छी वाल्याची मच्छी देखील रस्त्यावर फेकून दिली आहे. सज्जड दम भरला पुन्हा इथे दिसू नको अस म्हंटली.
ठाण्यातील कळवा खारीगाव परिसरात आगरी कोळी समाजातील महिलांनी परप्रांतीय मच्छी विक्रेत्याला चोप दिल्याची घटना घडली आहे. सोशल मिडिया वर viral होत आहे ,आपल्या कामासाठी हा महिलेने लढा दिला मात्र त्याच म्हणण ऐकून घ्याव अस मत नेटकरी व्यक्त करत आहे .