जेव्हा अंगणवाडी सेविकाचा मुलगा अधिकारी होतो….ज्ञानेश्वरची सक्सेफुल स्टोरी!
राज्य भरात अंगणवाडी सेविकास संपावरती गेला, अनेक अंगणवाडी सेविकांनी संप पुकारले. त्यामुळे अंगणवाडी सेविका या पुन्हा एकदा सर्व महाराष्ट्राला चर्चेत आल्या, अशाच एका अंगणवाडी सेविकेचा मुलगा हा मोठा अधिकारी झाला,
नुकत्याच झालेल्या एम पी एस सी मध्ये ज्ञानेश्वर यांनी घवघवीत असे यश मिळवले, सर्व सामान्य कुटुंबातील ज्ञानेश्वर बबनराव मुखेकर हे पाथर्डी चे भूमिपुत्र आहेत. त्यांचं प्राथमिक शिक्षण हे जिल्हा परिषेदेच्या शाळेत झालं. माध्यमिक शिक्षण हे कोरडगाव येथिल हायस्कूल झाले.
आई अंगणवाडीसेविका आणि वडील शेती संभाळत मजुरी करत असे , जेमतेम परिस्थिती असताना ही धीरज ज्ञानेश्वर यांनी आपल उच्च शिकणं पूर्ण केलं . चांगला अभ्यास करून डिग्री मिळवली , भाऊ धीरज सध्या आयटी कंपनीत काम करतो तर ज्ञानेश्वरचं यांचं शिक्षण बीई पूर्ण होऊन ते ही आपल्या अभ्यासाच्या जोरावर नोकरी करत होते त्यांचा शैक्षणीक संघर्ष जाणून घेऊ ….
नगरमध्ये पॉलीटेक्निक अहमदनगर या ठिकाणी त्यानी डिप्लोमा पूर्ण केला आणि त्यानंतर सिंहगड कॉलेज या ठिकाणी त्याने डिग्री पूर्ण केली
इंजिनिअरिंग पूर्ण झाल्यानंतर आपण चांगल्या ठिकाणी नोकरी करावी आणि काहीतरी करावी अशी इच्छा मनोमन होती त्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले, त्यामुळे ज्ञानेश्वर यांनी यूपीएससीचा अभ्यास करण्यास सुरुवात केली 2018 च्या मेन्स मध्ये अगदी थोड्या मार्गाने त्यांचा कॉल राहिला पहिला प्रयत्नात आपण अगदी ध्येयाच्या जवळ पोहोचलो मात्र अपयश आलं तरीही खचून न जाता त्यांनी त्यांचा अभ्यास सुरूच ठेवला, आणि 2020 च्या एमपीएससी मध्ये ते उत्तीर्ण झाले आणि कक्षा अधिकारी मंत्रालय म्हणून त्यांचे नियुक्ती झाली एवढ्यावर च ते थांबले नाही , ‘संघर्ष अजून संपला नाही कारण मी अजून जिंकलो नाही… अस म्हणत अभ्यास सुरूच ठेवला. तर नुकत्याच झालेल्या एमपीएससीच्या निकालामध्ये त्यांना चांगले यश मिळालं आणि सध्या ते वर्ग एक पदी रुजू होतील अशी अपेक्षा देखील त्यांनी व्यक्त केली. पहिल्यांदा आलेल्या अपयशाला दोन हात करत त्यांनी प्रयत्न सुरू ठेवले आणि त्यांना यश ही मिळाल,
त्यांच्या या अभ्यासाच्या संघर्षामध्ये त्यांना त्यांच्या आई-वडिलांचे साथ मिळाली ,मामांची ,चुलत्यांच्या ,मित्र परिवाराची मोठ्या प्रमाणावरती साथ मिळाली असे ते आवर्जून सांगतात