शेतकऱ्यांना अतिवृष्टीची मदत मिळणार की नाही, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांमध्ये निर्माण होतोय संभ्रम.

विजय चौधरी- सोयगाव तालुका प्रतिनिधी
महसूल व कृषी विभागाकडून शेतकऱ्यांच्या हातावर तुरी देण्याचे काम, तर महसुल व कृषी अधिकारी यांचे फक्त शेतकऱ्यांच्या बांदावर जाऊन वाहवाह मिळविण्यासाठी फोटो सेशन पुरते मर्यादित.

सोयगाव दि.२९…. जून ते आक्टोबर महिन्याच्या कालावधीत झालेल्या अतिवृष्टीने सोयगाव तालुक्यातील सावळदबारा,सोयगाव, जरंडी व बनोटी या चारही मंडळात शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे, गेल्या तीन वर्षांपासून होणारी अतिवृष्टीमुळे शेतकरी अगोदरच आर्थिक अडचणीत सापडला असून यावर्षीचा हंगाम देखील अतिवृष्टीमुळे हातून गेला आहे जून ऑक्टोबर या कालावधीत अतिवृष्टीने सोयगाव तालुक्यातील चारही मंडळात शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.

मात्र महसूल विभाग व कृषी विभागाकडून अद्यापही काही शेतकरी नुकसानीची पाहणी करण्याची तत्परता दाखविल्या गेली नाही ,मागील आठवड्यात कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी सोयगाव तालुक्यातील शेतीनुकसनाची पाहणी केली व महसूल व कृषी विभागास वस्तुनिष्ठ शेताच्या बांधावर जाऊन पंचनामे करण्याचे आदेश दिलेत मात्र महसूल व कृषी विभागाकडून थेट कृषिमंत्री यांच्याच आदेशाला खो देण्याचा प्रकार सोयगाव तालुक्यात घडल्याने अतिवृष्टी नुकसानीची मदत मिळेल की नाही असा संभ्रम सोयगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनामध्ये निर्माण झाला निर्माण झाला आहे
कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी सोयगाव तालुक्यातील शेतकरी नुकसानीची पाहणी करताच महसूलच्या व कृषीच्या अधिकाऱ्यांना नुकसान ग्रस्त शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामा करण्याचे आदेश दिले आहेत मात्र महसूल व कृषी आधीकारी हे फक्त ठराविक शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रसिद्धीसाठी फोटोसेशन करताना मग्न दिसून येत आहे सावळदबारा, सोयगाव, जरंडी व बनोटी या चारही मंडळातील नुकसानग्रस्त शेतकरी पंचनाम्यापासून वंचित आहेत, त्यामुळे अतिवृष्टीच्या मदतीपासून आपल्याला वगळले जाते की काय? आपल्याला नुकसान भरपाई मिळेल का नाही ही अनिश्चितता अजूनही सोयगाव तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये आहे…..