” आईला शेतात मदतीसाठी जाताना रस्त्यात अडवून अल्पवयीन मुलीसोबत….!” पहा बातमी सविस्तर.

राज्यात दिवसेंदिवस महिला अत्याचाराच्या घटना वाढत आहेत. बाहेर फिरताना काय आणि शेतात काम करताना काय कुठेही महिला सुरक्षित नाहीयेत. अत्यंत धक्कादायक अशी बातमी समोर येते आहे. शेतात मजुरीसाठी चाललेल्या अल्पवयीन मुलीवर गावातीलच सहा तरुणांनी सामूहिक बलात्कार केला आहे.
कन्नड तालुक्यात हि घटना घडली आहे. औरंगाबाद मधील कन्नड तालुक्यात ही घटना घडली. कन्नड ग्रामीण पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा नोंदवत सहा आरोपींना अटक केली आहे. त्यापैकी एक आरोपी अल्पवयीन असल्याची माहिती मिळाली आहे.
या घटनेनंतर गावात एकच खळबळ माजली. देशात स्वातंत्र्य महोत्सव साजरा केला जातो. एकीकडे जनतेला पंतप्रधान मोदी महिलांचा आदर करण्याचा, संकल्प करण्याचा आव्हान देत आहे तेच अशाच वेळी एका गावातील मजुरीसाठी जाणारी अल्पवयीन मुलगी हिच्या वरती सहा नराधम बलात्कार करत होते.
महिलांची सुरक्षा करणे हे बोलण्यात, कागदावरती वारंवार केल जात मात्र प्रत्यक्षात आजही देशात दर सेकंदाला कुठे ना कुठे महिलांवरती अत्याचार होतच आहेत. सन्मानाला पात्र महिलांना मात्र सातत्याने कचऱ्याची टोपी दाखवली जाते. औरंगाबाद मधील नराधमांनी अल्पवयीन निष्पाप मुलीच्या अब्रूचे चिंधड्या उडवल्यात त्यामुळे महिला कुठे कशी आणि कधी सुरक्षित आहे या प्रश्नांची उत्तरे कधीच मिळत नाही.
आपल्या आई-वडिलांना शेतात कामात मदत व्हावी म्हणून ही अल्पवयीन मुलगी मजुरीसाठी जात होती. या मुलीला वाटेत अडवलं आणि बळजबरीने एका शांत ठिकाणी घेऊन गेले. आणि आळीपाळीने सहा जणांनी तिच्यावरती बलात्कार केला. त्यानंतर आरोपींनी मुलीला तिथून सोडून पसार झाले ती मुलगी वेदनेना व्याकुळ झाली होती.
ती कशी बशी घरी पोहोचली घरी आल्यानंतर तिन घडलेला प्रकार आपल्या आईला सांगितला. आईने कन्नड ग्रामीण पोलीस ठाणे गाठलं आणि त्यानंतर गुन्हा नोंदवत आरोपींना जेल बंद करण्यात आलं. यापैकी काही आरोपींनी या आधीही मुलीवरती बलात्कार केला होता मात्र मुलींना आपल्या भीतीपोटी कुणाला काहीही सांगितलं नव्हते.