NCP अध्यक्ष नगर दौऱ्यावर मार्गस्थ असतानाच, राष्ट्रवादीच्या या नेत्याचा राजीनामा पहा बातमी सविस्तर.

अहमदनगर शहर राजकारणात खळबळ माजवणारी ही बातमी आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय शरदचंद्रजी पवार यांच्या विचारावरती चालणार काम आज अनेकांनी केलं. शरद पवार यांच्याकडे पाहून अनेक संघटनेशी जोडले गेले आहेत मात्र नगर जिल्ह्याच्या दौरावर श्री शरद पवार असतानाच येण्याच्या पूर्व संधेलाच अहमदनगर जिल्हा राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा सौ मंजुषाताई गुंड यांनी दिला.
त्या पुढे असेही म्हणाल्या की, माझे प्रामाणिक पक्ष कार्य व महिलांची संघटन लक्षात घेऊनच माझ्यावर पाच वर्षांपूर्वी अहमदनगर जिल्हा राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवली यासाठी मी पक्षातील सर्व नेत्यांचे मनापासून आभार मानते. त्या जबाबदारीला न्याय देत मी मजबूत महिला संघटन उभा करण्याचा प्रयत्न केला. आज मी अहमदनगर जिल्हा राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टीच्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा देत आहे.
पण तरीही यापुढेही मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे काम करत राहील व पक्ष जी जबाबदारी देईल, ती जबाबदारी पार पाडण्याचा प्रयत्न करेल. असे त्यांनी म्हटल आहे. मात्र खासदार शरद पवार यांचा जिल्हा दौरा होणार आहे आणि याच पूर्वसंध्येला राजीनामा देणे यामुळे आता चर्चा सुरू आहेत.
