लग्नाचा विधी सुरु असतानाच वऱ्हाडी पडले नवरीच्या अंगावर; Video मध्ये पहा काय झाली नवरीची अवस्था.
आपला भारत देश हा विविधतेने नटलेला आहे. या देशांमध्ये अनेक वेगवेगळ्या संस्कृती पाहायला मिळतात यामध्ये विवाहाला विशेष असे महत्व दिलेले आहे. भारतात केला जाणारा विवाह हा एक सामाजिक सणासारखाच असतो. या विवाहामध्ये दोन लोक दोन कुटुंब वेगवेगळ्या परंपरा आणि विधींचे पालन करून एकमेकांचे सगळे सोयरे होऊन जातात. यामध्ये वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या परंपरा असतात यापैकी काही परंपरा आपल्याला माहितही नसतात आणि अशाच एका विधी दरम्यान धक्कादायक प्रकार घडला आणि तो सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
लग्नाचे बरेचसे व्हिडिओ व्हायरल होत असतात आणि तुम्ही ते पाहिले देखील असेल पण या व्हिडिओने मात्र सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की नवरा आणि नवरी एकमेकांच्या समोर बसलेले आहेत. त्यांचा काहीतरी विधी चालू आहे आणि इतक्यातच वर पक्ष व वधू पक्ष एकमेकांसमोर उभे ठाकतात. दोन्ही पक्षांच्या कडे हातामध्ये असलेल्या कापड खेचण्याची स्पर्धा लागलेली असते.
आणि हे करत असतानाच एका पक्षाकडे जास्त प्रमाणात कापड ओढल जाते आणि नवरदेव नवरीचा जो विधी चालू असतो त्यामध्ये या सगळ्यामुळे व्यत्यय येतो.
हा व्हिडिओ काही सेकंदाचा आहे पण लोकांना मात्र थक्क करून जातो सुरुवातीला तुम्ही जर पाहिले तर हे सगळं प्रकरण गंभीर वाटेल पण नीट जर पाहिलं तर तुम्हाला हसू आवरणार नाही लग्नाची एक परंपरा सर्वजण उत्साहाने साजरी करत होते पण त्यामध्ये चुकून सर्वजण नवरीवरच पडले आणि नवरी सोबत जे काही घडलं ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळाले आहे