गुन्हेगारी

उडीद पिकाची मळणी चालू असताना साडीचा पदर मळणी यंत्रात गुंतला अन्..

सध्या सगळीकडे शेतीचे कामे चालू असतात हि कामे करत असताना धान्य लवकर करून घरी आणायची घाई सगळ्यांना असते, पण घाई घाई मध्ये बऱ्याच विपरीत घटना घडत असते, असच शेतातील कामाची घाई असताना एका महिलेची साडी मळणी यंत्रात गुतली जाते आणि तिच्यासोबत नको ते घडते, काही क्षणापूर्वी आपल्यात असणारी दुसर्या क्षणाला हे जग सोडून गेली याबद्दल आपण जाणून घेऊ,

शेतातील उडीद पिकाची मळणी सुरू असताना मळणी यंत्रात साडी सापडून एका महिलेचा गुरफडून मृत्यु झाल्याची दर्दैवी घटना सोमवारी सकाळी ११ वाजता दरम्यान भंडारा जिल्ह्या च्या लाखांदूर तालुक्यातील दोन वेळा येथे घडली. शीतल धर्मशील कोचे वय 52 वर्ष असे मृतक महिलेचे नाव आहे.

सध्या भंडारा जिल्ह्यात उडीद, सोयाबीन, वाटाणा, हरभरा अशा विविध पिकांची काढणी करून त्याची मळणी करणे सुरू आहे. विशेषतः लाखांदूर तालुक्यात उन्हाळी धान पिकाची रोवणी करण्यासाठी लगबगीने शेत जमिनीची मशागत करणे सुरू असल्याने पिकांची काढणी सुरू झाली आहे. अशातच सोमवारी सकाळी शीतल धर्मशील कोचे यांच्या स्वतःच्या शेतातील उडीद पिकाची मळणी करण्यासाठी रुपचंद बगमारे यांची ट्रॅक्टर सह मळणी यंत्र सुरू होते.

यावेळी शीतल मळणी यंत्र व ट्रॅक्टर च्या मधोमध उभी असताना तिची साडी लोखंडी सॉफ्टिंग ला अडकून त्यात गुरफडल्याने शितलचा जागीच मृत्यू झाला. सदर घटनेची माहिती गावात पोहचताच ग्रामस्थांनी घटनास्थळाकडे एकच गर्दी केली. लाखांदूर पोलिसांना घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक रमाकांत कोकाटे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक संदीप ताराम, बीट जमादार दुर्योधन वकेकार व अन्य पोलीस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी पोहचून पंचनामा केला. यावेळी मृतदेह शवविच्छेदन साठी पाठविण्यात आले असून लाखांदूर पोलीस पुढील तपास करीत आहेत. शीतलच्या मृत्यूने गावात हळहळ व्यक्त केल्या जात आहे.

News Mall18

It is a News Channel where you can get all types of news like we have generated some category like Breaking News, Story News, Live News, Political News, Social news, Impact News Explainer Videos, Digital News, Viral News, Advertise News, Interviews, Promotions, Presentation, Entertainment, Related Movie Trailers, PRO, Awards Etc.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Share this news instead of copying!