सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गलथण कारभाराला जबाबदार कोण ?

श्रीरामपूर सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या हद्दीमध्ये कोणाच्या आशीर्वादाने काम चालू ?
अधिकाऱ्यांनी अर्थपूर्ण संबंध ठेवले असतील का ?
रस्त्याच्या कडेला जिओ डिजिटल फायबर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे ओ एफ सी केबल टाकण्याचे काम चालू आहे त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याकडून परमिशन घेतलेला आहे आणि पैसे सुद्धा भरलेले आहेत नियमात राहून अटी आणि शर्तीचे पालन करून त्यांना काम पूर्ण करण्याची परमिशन विभागाने दिलेले आहे.

रोडच्या मध्यापासून पंधरा मीटर अंतरावर ते काम करण्याचे परिपत्रक सार्वजनिक बांधकाम विभागून दिलेला आहे जेऊर, कुंभारी शिंगवे , पुणतांबा , श्रीरामपूर, देवळाली ताराबाद मांडवे पिंपळगाव या रोडच्या कडेला काम करण्याची परवानगी दिली आहे पण ते काम रोडला खेटून चालू आहे त्यामुळे लोकांच्या जीवित्याला धोका आहे
आणि रोड खचून जाणार आहे शेतकऱ्यांचे पाईपलाईन तुटत आहे रोड कामासाठी निधी कमी येत असतो रोडचे काम लवकर होत नाही आत्ताच रोडचे काम झालेले आहे पण हे रोडच्या कडेला एकदम खेटून काम झाल्याने रोडच्या आयुष्य कमी झाले आहे अधिकारी याच्यात लक्ष देत नाही का देत नसेल लय मोठे प्रश्नचिन्ह उभे आहे
निम्म्या रोडला त्या खोदकामाची माती पडत आहे ठेकेदार मनमानी कारभार करत आहे ठेकेदारांवर सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी गुन्हे दाखल केले पाहिजे नुकसान भरपाई घेतली पाहिजे काही दिवसानंतर रोडचे रुंदीकरण झाल्यास त्याला जबाबदार कोण असणार ठेकेदार का अधिकारी संगमनेर सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या दालनासमोर उपोषण करण्याचा इशारा छावा ब्रिगेडचे नगर जिल्हा अध्यक्ष योगेश यांनी दिला आहे ठेकेदार आणि अधिकारी यांच्यावर कारवाई होण्याबाबत उपोषणाला बसणार आहे शिस्तभंगाची कारवाई अधिकाऱ्यावर करण्याची मागणी योगेश शेटे यांची आहे