नगरचा हा व्हिडिओ आनंद महिंद्राने का केला ट्विट ? अस काय आहे त्या व्हिडिओत एकदा पाहाच
अहमदनगर जिल्ह्यात अनेक घडामोडी घडत असतात. यामध्ये अनेक घडामोडी कौतुकास्पद असतात. बऱ्याचदा अहमदनगरला राज्यातील कोणत्याही पहिल्या गोष्टींचा मान मिळतो. आता अहमदनगर बद्दल अशीच एक कौतुकास्पद घटना घडली. या घटनेमध्ये अगदी सर्वसामान्य असणाऱ्या कुशल कारागीराबाबत ही बातमी आहे. आपण एखादी कला सादर करतोय ती कला सर्वांपर्यंत पोहोचावी एवढीच माफक इच्छा एका कारागिराची असते. कारण तो कारागीर त्या गोष्टीमध्ये आपलं पूर्ण कौशल्य टाकत असतो. अहमदनगर शहरातील अशाच एका कारागिराचा हा व्हिडिओ आणि या मधला हा कारागीर नेमका कुठला आहे याची सविस्तर माहिती जाणून घेऊ.
काम करण्याचा अंदाज त्याचं कौशल्य ते भावले खुद्द महिंद्रा कंपनीचे मालक आनंद महिंद्रा यांना त्यांना या कारागिराबद्दल काहीही ठाऊक नसताना फक्त त्याचं काम आवडलं म्हणून व्हायरल होत त्यांना मिळालेला तो व्हिडिओ त्यांनी आपल्या ट्विटरला ट्विट केला. त्या व्हिडिओमध्ये असं काय आहे जे महिंद्रा यांना आवडलं आणि त्यांनी या कुशल कारागीरावर आपलं प्रेम बरसवलं. थोडक्यात सांगायचं झालं तर आनंद महिंद्रा यांच्या ट्विटरला नऊ मिलियन एवढ्या लोकांनी फॉलो केलेलं आहे. देशातील श्रीमंत बड्या उद्योगपती यांच्या यादी मधलं प्रतिष्ठित असं नाव म्हणजे आनंद महिंद्रा आहेत. अशा महान व्यक्तीकडनं आपलं कौतुक होणं या कारागीरा साठी अभिमानाची गोष्ट आहे.
अहमदनगर शहरातील दरबार फेब्रिकेशन च्या समीर बागवान आसिफ पठाण आणि एजाज खान यांनी तयार केलेल्या फोल्डिंग होणारा जिन्याच कौतुक उद्योगपती महिंद्रा यांनी केले. यामध्ये त्यांनी जिना बनवतानाचा व्हिडिओ ट्विट करून जिन्याची निर्मिती करणाऱ्याची स्तुती केली आहे. अतिशय रुंद गल्लीत फोल्डिंग जिना बनवण्याचे काम दरबार फेब्रिकेशन यांनी केला आहे. हे अहमदनगर शहरातील जुन्या महापालिकेच्या समोरचे आहे. एका भिंतीला हा जिना फोल्ड करून लावता येतो. आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे जेव्हा तुम्हाला जिन्याचा वापर करायचा आहे तेव्हा तो जिना काढता येतो, आणि जेव्हा तुम्हाला याची गरज नसेल तेव्हा हा जिना तुम्हाला भिंतीला लॉक देखील करता येतो.
दरबार फेब्रिकेशन चे समीर बागवान यांनी हा जिना बनवल्यानंतर त्याचा व्हिडिओ आपल्या फेसबुक वर पोस्ट केला होता. आणि हाच व्हिडिओ महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचे चेअरमन आनंद महिंद्रा यांनी पाहिला आणि पाहिल्यानंतर तो व्हिडिओ त्यांनी त्यांच्या ऑफिशियल ट्विटर अकाउंट वरून ट्विट केला.
कमीत कमी जागेत हा जिना किती उपयोगी होऊ शकतो, हे या व्हिडिओ मधून आपल्या सगळ्यांना पाहायला मिळते आहे. या जिन्याचा व्हिडिओ बघितल्यानंतर आनंद महिंद्रा यांनी कौतुक केले ते म्हणतात की, अप्रतिम ! अतिशय साधं, पण सृजनशील आणि या जिन्यामुळे घराच्या सामान्य भिंतीच सौंदर्य वाढला आहे .आणि चांगल्यातल्या चांगल्या डिझायनरला देखील आपला हेवा वाटेल. अशा शब्दांमध्ये महिंद्रा यांनी समीर बागवान यांचे कौतुक केला आहे.
आनंद महिंद्रा यांनी जो अहमदनगर मधील जिन्याचा व्हिडिओ ट्विटर वर टाकला आहे. तो आतापर्यंत दोन लाख लोकांनी पाहिला आहे. तर या व्हिडिओवर पाच हजार पेक्षा जास्त लोकांनी कमेंट केले आहेत. चक्क आनंद महिंद्रा यांनी आपल्या कामाचं कौतुक केलं आहे, आणि या केलेल्या कौतुकामुळे आपल्याला आणखी चांगलं काम करण्याची ऊर्जा मिळाली आहे. असं मत दरबार फॅब्रिकेशन चे समीर बागवान यांनी व्यक्त केलं.