भारतीय चलनावरून राष्ट्रपिता गांधीजी जाणार ? जाणून घ्या सविस्तर वृत्त
सोशल मीडियावर दररोज काही ना काही व्हायरल होत असते. आता त्यातच एका गोष्टीची चर्चा जास्त प्रमाणात होत होती आणि तो विषय असा होता की, भारतीय चलनावरून लवकरच राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा फोटो काढला जाऊन रवींद्रनाथ टागोर व डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांचेही फोटो असतील असे वृत्त माध्यमांतून प्रसिद्ध होत आहे.
महात्मा गांधी रवींद्रनाथ टागोर आणि एपीजे कलाम यांचे दोन वेगवेगळी वॉटर मार्क सेट आय आय टी दिल्लीला पाठवले आहेत. आणि त्या तीन वॉटर मार्क मधून प्राध्यापक दिलीप साहनी यांना यापैकी एकाची निवड करण्यासाठी सांगितले आहे. नंतर हा प्रस्ताव केंद्र सरकारसमोर ठेवून जाणार असून केंद्र सरकार अंतिम निर्णय घेणार.
भारतीय रिझर्व बँकने निवेदन देऊन बातमीचे खंडन केले आहे आणि या निवेदनामध्ये असे म्हणत आहे की प्रसारमाध्यमांमधून असं वृत्त दिले जाते की आरबीआय सध्याच्या चलनी नोटांवरील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या फोटोच्या बदल्यात अन्य महापुरुषांच्या फोटोसह नोटा छापण्याची तयारी करत आहोत. माध्यमांमधून प्रसारीत होत असलेली ही बातमी प्रत्यक्षपणे चुकीची आहे असा कोणताही प्रस्ताव आरबीआय समोर आलेला नाही असे बँकेने स्पष्ट शब्दात सांगितलेले.
रिझर्व बँकेने ट्विट करून एक प्रेस नोट जारी केली आहे आणि या प्रेसनोट मध्ये काही गोष्टी स्पष्ट केल्या आहेत अर्थ मंत्रालय व रिझर्व बँक नोटांवर रवींद्रनाथ टागोर आणि माजी राष्ट्रपती ए पी जे अब्दुल कलाम यांच्या चित्रासह नोटा छापण्याचा विचार करीत असल्याच्या बातम्या माध्यमांमधून प्रसिद्ध होत होत्या मात्र सध्या चलनात असलेल्या नोटा मध्ये कोणतेही बदल केले जाणार नाही असा खुलासा भारतीय रिझर्व बँक ऑफ इंडियाने दिला आहे.