चिंताजनक : उज्वला गॅस योजनेत उद्यापासून होणार हा मोठा बदल.
भारत देशांमध्ये मागील काही दिवसापासून गॅस सिलेंडरच्या दरात वाढ झाल्याचे आपण पाहिल आहे. जर आपल्यापैकी कोणाला नवीन घरगुती गॅस कनेक्शन घ्यायचे असेल तर आता जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. कारण आता पेट्रोलियम कंपन्याच्या गॅस कनेक्शन च्या किमती मध्ये भरपूर प्रमाणात वाढ केली आहे.
इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम व हिंदुस्तान पेट्रोलियम यांनी दिलेल्या माहितीनुसार,
▪️ गॅस कनेक्शन घेणाऱ्या ग्राहकांना यापूर्वी नवे सिलिंडरचे कनेक्शन घेण्यासाठी 1450 रुपये मोजावे लागायचे. मात्र उद्यापासून म्हणजेच 16 जूनपासून नागरिकांना 750 रुपयांची वाढ झाल्याने 2200 रुपये द्यावे लागणार आहेत.
▪️ पेट्रोलियम कंपन्यांकडून 14.2 किलोग्रॅम वजनाच्या गॅस सिलेंडरचं ग्राहकांनी नवीन कनेक्शन घेतल्यास प्रति सिलेंडर त्यांना 750 रुपये अधिक द्यावे लागणार आहेत.
▪️ ग्राहकांनी जर दोन सिलिंडरचे कनेक्शन घेतले तर 1500 रुपये जास्त द्यावे लागणार आहेत. म्हणजेच, यासाठी एकूण 4400 रुपये सिक्युरिटी रक्कम म्हणून भरावी लागणार आहे. हे नवीन दर 16 जून 2022 पासून लागू होईल, अशी माहीती आहे.
नवीन गॅसच्या किमती बरोबर गॅसला वापरले जाणारे रेग्युलेटर चे ही दर आता वाढले गेले आहेत. सगळ्यात महत्वाची बातमी म्हणजे आता आपल्याला 150 ऐवजी 200 रुपये मोजावे लागणार आहेत आणि ही दरवाढ उद्या म्हणजेच 16 जून पासून हे नवीन दर देखील लागू करण्यात येणार आहेत. पाच किलोच्या सिलेंडरच्या सुरक्षेसाठी आठशे रुपये पन्नास रुपये मोजावे लागतील अशी माहिती पेट्रोलियम कंपन्यांनी आपल्याला दिले आहे दिलेली आहे.
आणि आता त्यातच केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री उज्वला योजनेच्या अंतर्गत येणाऱ्या ग्राहकांनाही नवीन दर लागू झाल्यामुळे फटका बसण्याची शक्यता देखील आहे. उज्वला योजनेचे ग्राहकांना पहिल्यांदा कनेक्शन घेणाऱ्या ग्राहकांना पूर्वीप्रमाणेच सुरक्षा रक्कम भरावी लागेल, परंतु त्यांना दुसरे कनेक्शन घ्यायचे असेल म्हणजेच गॅस कनेक्शन डबल करायचं असेल तर दुसऱ्या सिलेंडरसाठी वाढलेली सिक्युरिटी त्यांना भरावी लागणार आहे असे देखील पेट्रोलियम मंत्री यांनी सांगितले आहे.