‘या , दिग्गज बॉलीवूड अभिनेत्रीने दिली ‘सावली’ला भेट ,मुलांना झाला अगणित आनंद
गेल्या अनेक वर्षांपासून वंचित घटकातील एकल पालक असणाऱ्या मुलांना सांभाळण्याचं काम केडगाव येथील संकल्प प्रतिष्ठान अंतर्गत चालणारी सावली संस्था करत आहे,त्या सावलीमध्ये या मुलांना माणुसकीचे सावली मिळते, मुलांचा संगोपन, योग्य संस्कार आणि त्यांचे शिक्षण सूत्री वरती सावली संस्था चालते. या सावली संस्थेचा कारभार नितेश बनसोडे हे पाहतात, सावलीतील अनेक वेगवेगळे उपक्रम राबवले जातात, अनेक जण सावलीला भेट देतात.
आपले वाढदिवस आपले समारंभ या ठिकाणी आपल्या परीने जेवढी होईल तेवढी मदत सावली या संस्थेतील मुलांना करता.त अशीच एक स्नेह भेट दिगगज बॉलीवूडच्या अभिनेत्रीने नुकतीच दिली ,सावलीत मुलांना खऱ्या अर्थाने मुलांना निर्भयता अनुभवण्यास मिळत आहे..परंतु समाजात गेल्यावर डरो मत असे सांगीतले. दोनशे पेक्षा जास्त जाहिराती व अनेक हिंदी फिल्म मध्ये अभिनेत्री म्हणून काम केलेल्या अर्शीन मेहता सावलीत आल्यावर मुलांना खूपच आनंद झाला.. मुलांबरोबर एकरूप होऊन मुलांसमवेत नृत्य केले… गाणी म्हणाली..आणि खूप गप्पा मारल्या.
मुलांचे बरोबर अंगत पंगत देखील केली.. सावलीचे काम प्रेमाने भरलेले आहे हे पाहून मी सावलीच्या प्रेमात पडले आहे. यापुढे सदैव सावलीच्या सोबत असेल असे याप्रसंगी अर्षीन मेहता यांनी सांगितले . सावलीत मुलंच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून आणि आत्मविश्वास बघून मला खूप समाधान वाटले.
मेहनत करा खूप शिका आणि मोठे व्हा अशा शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी आय एम एस मॅने कॉलेज चे संचालक सुधीर मेहता सर उपस्थित होते त्यांनीही मुलांना मार्गदर्शन केले. अभिनेता अवनीश याप्रसंगी उपस्थित होते. संस्थापक नितेश बनसोडे यांनी अर्निष मेहता यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देऊन आभार मानले