होय तो लोकनेता फकीरच ! निलेश लंके यांच्या संपत्ती व कर्जाचा आकडा समोर; कार्यकर्त्यांच्या कर्जाला जमीनदार असलेला पहिला लोकप्रतिनिधी.
नगर : प्रतिनिधी
लोकसभा निवडणूकीमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार नीलेश लंके यांची सन २०१९ च्या तुलनेत स्थावर आणि जंगम मालमत्ता घटली असून त्यांचे कर्जही वाढले आहे ! राजकीय क्षेत्रातील व्यक्तींच्या मालमत्तेत पाच वर्षांच्या कालवधीमध्ये प्रचंड वाढ होत असताना लंके यांची झोळी मात्र रिकामीच असल्याचे मंगळवारी त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना सादर केलेल्या प्रतिज्ञा पत्रावरून स्पष्ट झाले आहे.
नीलेश लंके यांनी सन २०१९ मध्ये विधानसभेची निवडणूक लढविली. त्यांनी त्यावेळी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांची स्थावर मालमत्ता १५ लाख ३५ हजार १५३ रूपये इतकी होती. तर जंगम मालमत्ता ५८ लाख ५६ हजार ५२१ इतकी होती. सन २०१९ मध्ये त्यांच्यावर ३२ लाख २८ हजार ९८९ 989 रूपयांचे कर्ज होते.
लंके यांनी लोकसभा निवडणूकीचा अर्ज मंगळवारी दाखल केला त्यावेळी त्यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांची स्थावर मालमत्ता सुमारे ४ लाखांनी वाढली आहे. १९ लाख २२ हजार २१० इतकी स्थावर असून जंगम मालमत्तेमध्ये मात्र कमालीची घट झाल्याचे प्रतिज्ञापत्रावरून दिसून येते. सन २०२४ मध्ये लंके यांच्या जंगम मालमत्तेेत ३५ लाख २४ हजार २९५ रूपयांची घट झाली आहे. तर लंके यांच्यावरील कर्ज ३७ लाख ४८ हजार ७५७ इतके असून सन २०१९ च्या तुलनेत ते वाढले आहे.
बँक ठेवी व इतर
हातावरची रोख रक्कम ८१ हजार ४००,राणी नीलेश लंके ४० हजार २००, तेजस नीलेश लंके ५हजार, शिवम नीलेश लंके ६ हजार, स्टेट बँक सुपा शाखा बचत खाते शिल्लक ७ लाख ७६ हजार ८९६ रूपये, राणी लंके बँक ऑफ बडोदा बचत खाते ३१ हजार ८३४ रूपये, तेजस लंके बचत खाते ६ हजार ५६९, शिवम लंके बँक ऑफ बडोदा ४ हजार २७१ रूपये, साई मल्टीस्टेट पतसंस्था वाडेगव्हाण शाखा बचत खाते रूपये १२०
सेनापती बापट मल्टीस्टेट पतसंस्था शेअर्स १२ हजार ५१० रूपये, नगर अर्बन को ऑप बँक शेअर्स ८ हजार ४००
हयुंदायी क्रेटा १३ लाख ५ हजार ८००,सोने, जडजवाहीर,चांदी
नीलेश लंके १ लाख ४७ हजार १००, राणी लंके २ लाख ६ हजार २५०
एकूण स्थुलमुल्य
नीलेश लंके : २३ लाख ३२ हजार २२६रूपये, राणी लंके २ लाख ७८ हजार १८४,हंगे येथे गट नं.८३२ नीलेश लंके यांच्या नावे येथे १० गुंंठे
कर्ज : ३१ मार्च २०२४ अखेर कर्ज ७ लाख १३ हजार ७५७ स्टेट बँक ऑफ इंडिया कार लोन, असुरक्षित कर्ज ३० लाख३५ हजार ,३७ लाख ४८ हजार ७५७ रूपये.
जंगम मालमत्ता : नीलेश लंके २३ लाख ३२ हजार,२२६,राणी लंके २ लाख ७८ हजार २८४
कार्यकर्त्याच्या कर्जाला जामीनदार !
साई मल्टिस्टेट पतसंस्थेकडून लंके यांचे कार्यकर्ते ईश्वर ब्राम्हणे यांच्या कर्जप्रकरणात आ. नीलेश लंके हे जामीनदार आहेत. कर्जदार ब्राम्हणे यांनी कर्ज वसुलीप्रकरणी नीलेश लंके यांचा धनादेश दिला होता. हा धनादेश न वटल्याने लंके यांच्यावर भा दं वि १३८ प्रमाणे लंके यांच्यावर गुन्हा दाखल आहे.
शेतकरी आंदोलनाचा एकच गुन्हा
एकीकडे खा. डॉ. सुजय विखे हे नीलेश लंके यांच्यावर गुंडगिरीचा आरोप करीत असले तरी लंके यांच्यावर केवळ एकच गुन्हा दाखल असून सुपा येथे कांद्याचे भाव कोसळल्याने कांदा निर्यात सुरू करण्यासाठी त्यांनी सुपा चौकात केलेल्या आंदोलनाबाबत त्यांच्यावर शेतकरी आंदोलनाचा केवळ एकच गुन्हा दाखल आहे. लंके यांच्या प्रतिज्ञापत्राचे अवलोकन केले असता खा. डॉ. विखे यांचा गुंडगिरीचा आरोप खोटा ठरतो.