गणेश चतुर्थीच्या दिवशीच ‘या’ गणेश मंदिरात घडले असे काही, वाचून तुम्हीही थक्क व्हाल !! पहा सविस्तर बातमी.
धुमधडाक्यात गणेशोत्सवाला सर्वत्र जोरदार तयारी सुरू झाली आहे. पुढील दहा दिवस लाडके बाप्पा आपल्यामध्ये विराजमान होणार आहेत. लहान थोर सर्वांमध्येच गणेशोत्सवाचा आनंद पाहायला मिळतो. मात्र याच गणेश उत्सवाच्या दिवशी मश्रुम गणपती मंदिरात अनपेक्षित अशी घटना घडली. आठशे वर्षांपूर्वी मश्रुम या गणपती मंदिरात गणरायांची स्थापना करण्यात आली होती. भाविकांनी या मंदिराचा कायापालट करत मश्रुम गणपती मंदिराचा जुर्णोद्धार देखील केला. मंदिरावर सोन्याचा कळस बसवला मश्रुमी गणपती मंदिराला दर्शन घेण्यासाठी कर्नाटकसह महाराष्ट्रातील भाविक मोठ्या संख्येने दाखल होत असतात.
आठशे वर्षाचा इतिहास असल्यामुळे अनेक भाविकांच्या या मंदिरा सोबत अनेक धार्मिक, अध्यात्मिक अशा भावना आहेत. सोलापुरातील जोडभावी पेठ पोलील ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. यापूर्वीही 2016 मध्ये मश्रुम गणपती मंदिरावर सोन्याचा कळस चोरीला गेला होता. त्यानंतर गणेश चतुर्थीच्या दिवशीच मंदिरावरील कळस चोरीला गेल्याने नागरिकांमध्ये असंतोष भावना आहे.
गणेश चतुर्थीच्या गणपती मंदिराची सुरक्षा धोक्यात आली असल्याने भाविकांनी आश्चर्य व्यक्त केल जात आहे. गणपती मंदिरावरील सोन्याचा कळस चोरीला गेल्याने सोलापूर पोलीस दलाबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत. समर्थ या स्वामी रामदास यांच्या मूळ गावी मूर्ती चोरीला जाण्याचा प्रकरण ताज असतानाच या गणेश मंदिरावरील कळस चोरीला गेल्याने पुन्हा एकदा धार्मिक स्थळ यांची सुरक्षितता याचा प्रश्न ऐरणीवरती आली.
हे चोरटे नेमके मंदिराना टार्गेट का करतात ? असा सवाल उपस्थित केला जातो. सोलापूर- तुळजापूर -औरंगाबाद महामार्गावरती हे मश्रुम मी गणपतीच मंदिर आहे. सोलापूरचे ग्रामदैवत असणाऱ्या सिद्धेश्वर महाराज यांनी आठशे वर्षांपूर्वी या गणरायाची स्थापना केली होती. तेव्हापासून आजतागायत या मंदिरामध्ये भव्य गणेशोत्सव साजरा केला जातो .मात्र याच गणेशोत्सवाच्या सुरुवातीलाच असा प्रकार घडल्याने भाविकांमध्ये नाराज आहेत.