युवकांनी नोकरी मागे न धावता उद्योग व्यवसायात उतरावे. – आण्णा पाटील नरसाळे, उपसरपंच गोरेगाव
मॉडेल व्हिलेज गोरगावच्या उपसरपंच पदी निवड झाल्याबद्दल भाळवणी येथील संदीप तांबे मित्र परिवार आणि युवा व्यावसायिक वर्गाच्या वतीने आण्णा पाटील नरसाळे यांचा सत्कार करण्यात आला. भाळवणी ग्रामपंचायतच्या सदस्य पदी निवडून आल्याबद्दल युवराज रोहोकले व प्रकाश रोहोकले यांचा देखील सत्कार करण्यात आला.
अरिहंत हॉस्पिटल येथे झालेल्या या सत्कार प्रसंगी हॉटेल ऋषिकेशचे संचालक नानाशेठ चेमटे, स्क्रॅप मर्चंट आदिनाथ शेठ भागवत,डॉ.शैलेश लोढा,प्रशांत उपाध्ये,युवराज रोहोकले यांसह अनेक व्यावसायिक यावेळी उपस्थित होते.
युवकांनी नोकरीच्या मागे न पळता उद्योग व्यवसायात उतरले पाहीजे.आज ग्रामीण भागामध्ये देखील अनेक व्यवसायाच्या संधी उपलब्ध आहेत.भाळवणी सारख्या बाजारपेठेच्या गावामध्ये अनेक युवकांनी आपले व्यवसाय उभे केले आणि नवनवीन उद्योगांमध्ये यशस्वी झाले आहेत.त्याप्रमाणेच मा.सभापती मा.श्री.बाबासाहेब तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली आपण देखील गोरेगाव येथे भव्य शॉपिंग कॉम्प्लेक्स उभारून युवकांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सत्कार प्रसंगी बोलताना अण्णा पाटील नरसाळे यांनी सांगितले.
प्रसंगी साहेबराव नरसाळे,सबाजी शेरकर,विकास काकडे,भाऊसाहेब तांबे,विठ्ठल नरसाळे,नितीन काकडे,धंनजय नरसाळे,अरुण मंजुळे,जालिंदर रोहोकले,निलेश रोहोकले,संदीप राऊत,देव माणूस,आदी उपस्थित होते. दिशा फाऊंडेशनचे अध्यक्ष संदीप तांबे यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.