बाप रे ! भाजपा आमदाराच्या दहीहंडी कार्यक्रमाला गालबोट लागलेच, बघा काय आहे प्रकरण सविस्तर.

सध्या सगळीकडे दहीहंडीचे वातावरण चालू होते. या दोन वर्षाच्या कोरोनाचा काळ संपल्यानंतर सरकारने दहीहंडीसाठी परवानगी दिली आहे. त्यामुळे सगळीकडे आनंदाचे उत्साहाचे वातावरण होते सर्व चौका चौकामध्ये, गावामध्ये, तालुका जिल्हा स्तरांमध्ये आपल्याला दहीहंडी कार्यक्रम होताना पाहायला मिळाला आहे. कित्येक दहीहंडीमध्ये सिने अभिनेता किंवा अभिनेत्री यांनी हजेरी लावली होती पण यातच दहीहंडीला गालबोट लागणारी घटना घडली आहे याबाबत आपण सविस्तर पाहू,
सगळीकडे दहीहंडीचे वातावरण असताना शुक्रवारी राज्यभरात दहीहंडी कार्यक्रम उत्साहामध्ये पार पडला. या दहीहंडीचा सगळ्यांनी मनसोक्त आनंद घेतला. बऱ्याच ठिकाणी थरावर थर रचताना आपल्याला पाहायला मिळाले. तर यामध्ये काही गोविंदा जखमी झाल्याच्या बातम्याही समोर आले आहेत. मात्र बुलढाण्यामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये चिखलीच्या भाजपा आमदार श्वेता महाले आणि भाजपा युवा मोर्चा ने आयोजित केलेल्या दहीहंडी कार्यक्रमांमध्ये तुफान प्रमाणामध्ये हाणामारी झाली आहे. आणि त्यामुळे या दहीहंडी कार्यक्रमाला गालबोट लागले आहे.
या दहीहंडीच्या कार्यक्रमांमध्ये हाणामारीत एक गोविंदा जखमी झाला आहे. यामध्ये दहीहंडी फोडण्यासाठी अनेक गोविंदा जमले होते. डॉल्बीच्या धुंदीत असताना जमावाने एका गोविंदाला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. हि मारहाण नेमकी कोणत्या कारणामुळे झाली हे अद्यापही स्पष्ट झालेलं नाही. आणि यानंतर त्या कार्यक्रमांमध्ये एकच गोंधळ उडाला.
दहीहंडीच्या मंडळात सुरुवातीला वाद झाला. जमावाने या युवकाला तीन मिनिटे बेदम मारहाण केली. मोठ्या प्रमाणात गर्दी असल्यामुळे पोलिसांनी एवढ्या गर्दीमध्ये जाऊन तरुणाला वाचवणे शक्य नाही. तीन मिनिटे जमावाने त्याला मारलं. मध्यरात्रीपर्यंत दहीहंडी कार्यक्रमाचे अक्षरशा युद्धभूमी सदृश परिस्थिती झाली होती. हा वाद नंतर शांत झाला, मात्र गर्दीमध्ये घडलेली या प्रकाराने एकच गोंधळ उडाला. या घटनेत गोविंदा जखमी झाला आहे शेवटी घाईघाईत दहीहंडी फोडण्यात आली आणि हा कार्यक्रम संपविण्यात आला.