छावा मराठा सेना यांच्याकडून जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देऊन संबंधितावर कार्यवाईची मागणी.

सुनिल घुमरे दिंडोरी प्रतिनिधी
छावा संस्थापक अध्यक्ष मा सुनिल भोर यांच्या आदेशानुसार व नाशिक ग्रामीण जिल्हाध्यक्ष श्री पोपट पताडे यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रमुख उपस्थितीत मा जिल्हाधीकारी साहेब यांना निवेदन देण्यात आले.
श्री पोपट भाऊ पा पताडे छावा मराठा ग्रामीण जिल्हा अध्यक्ष: आज दिनांक २३/०६/२०२३ रोजी छञपती शिवाजी महाराज यांच्या विषयी सोशल मीडियावरुन इंस्टाग्राम या माध्यमातून आक्षपाहऺ विचित्र पोस्ट वायरल करण्यात आली असून त्या व्यक्तिवर त्वरित कार्रवाई करावी यासाठी नाशिक येथेजिल्हाधीकारी कार्यालयात मा श्री राजेन्द्र वाघ साहेब यांना निवेदन देण्यात आले.
सदर इसमावर कार्यवाही नाही झाली तर छावा मराठा सेना नाशिक जिल्ह्यामध्ये तसेच महाराष्ट्र राज्यामध्ये तिर्व स्वरुपाचे आंदोलन करेन असा इशारा नाशिक जिल्हाध्यक्ष श्री पोपट पताडे यांनी निवेदनाद्वारे देण्यात आला.

निवेदन देण्यासाठी नाशिक ग्रामीण जिल्हाध्यक्ष श्री पोपट पताडे, ञंबकेश्वर तालुकाध्यक्ष शुभम मेढे, ञंबकेश्वर तालुका संपर्क प्रमुख जिवन पिंगळे, नाशिक शहर अध्यक्षा खुशीताई जैन, इगतपुरी तालूका संपर्क प्रमुख नितिन राव इ.संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.