बळीराजाला चांगले दिवस यावेत यासाठी श्री विठ्ठल चरणी वीट अर्पण. – किसान पुत्र श्रीकांत गदळे.
बीड प्रतिनिधी: महाराष्ट्रात गेल्या अनेक वर्षापासून सातत्याने पडणाऱ्या दुष्काळ मुळे शेतकऱ्यांवर येणारे अस्मानी संकटे असो की शेतकऱ्याच्या मालाला हमीभाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांच्या आत्महत्या दिवसानं दिवस वाढत असल्याचे दिसून येत आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी विठ्ठल रुक्मिणी चरणी प्रार्थना केली आहे.
बीड जिल्ह्यातील दहिफळ वडमाऊली ता.केज जिल्हा बीड येथील किसान पुत्र श्रीकांत विष्णू गदळे.हे राहणार असून त्यांनी पंढरपूरच्या श्री विठ्ठल चरणी वीट अर्पण करणार आहेत . किसान पुत्र श्रीकांत विष्णू गदळे हे गेल्या दहा-बारा वर्षापासून शेतकऱ्यांच्या प्रश्नावर व सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नावर निस्वार्थपणे सातत्याने काम करत आहे मात्र काम करत असताना त्यांच्याकडे कसलेही पद नसल्यामुळे त्यांना अनेक वेळा शेतकऱ्यांचे व सर्वसामान्यचे प्रश्न सोडवण्यामध्ये अडचण निर्माण होत आहे.
या सर्व गोष्टीवर पंढरपूरच्या श्री विठ्ठलाने लक्ष घालून बळीराजाचे चांगले दिवस आणावीत व सर्व जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी सरकारला सदबुद्धी देऊन आपल्याला आमदारकी मिळावी यासाठी पंढरपूरच्या पांडुरंगाला सागवाना पासून तयार केलेली वीट अर्पण केली असल्याचे म्हटले आहे.
विविध मार्गाने ते नेहमीच चर्चेत असतात व गेल्या अनेक वर्षापासून शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी पशुपक्षी प्राणी यांची जोपासना करण्यासाठी निसर्गाचे संतुलन टिकवून राहावे यासाठी ते सातत्याने काम करत असून पंढरपूरच्या पांडुरंगाने सर्व जनतेला व शेतकरी सुखी समाधानी होवा. महाराष्ट्र राज्य तील जनतेने सुखी समाधानी जीवन जगावे यासाठी आणि जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी विधान परिषदेवर घ्यावे ही सद बुद्धी सरकारला देण्यासाठी पांडुरंग चरणी साकडे घालून विठ्ठल रुक्मिणीच्या चरणी वीट अर्पण करणार असे गदळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे म्हटले आहे…