काँग्रेस नेत्यानं हॉटेलमध्ये नेलं, मग सामूहिक अत्याचार केले, अल्पवयीन मुलीच्या तक्रारीनंतर तिघांना अटक
देशात कॉंग्रेस भारत जोडो यात्रा सुरु आहे, त्यामुळे आता कुठे कॉंग्रेस उर्जा मिळाली आहे ,त्यामुळे सर्वत्र चर्चा सुरु आहेत .मात्र काही कॉंग्रेसचे पदाधिकारी चुकीचे काम करत आहेत हे समोर आलं ,युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शाहनवाज यांच्यासह तिघांनी अल्पवयीन मुलीला बिलासपूर येथील हॉटेलमध्ये नेऊन तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप पीडितेने केला आहे.
युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शाहनवाज यांच्यासह तिघांनी अल्पवयीन मुलीला बिलासपूर येथील हॉटेलमध्ये नेऊन तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप पीडितेने केला आहे. या प्रकरणी चिरमिरी पोलिसांनी कलम ३६३, ३६६ अ, ३७६ डी, ४६ पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.
छत्तीसगडमध्ये एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी युवक काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षासह तिघांना अटक करण्यात आली आहे.
मनेंद्रगडमधील चिरमिरी शहरात ही सामूहिक बलात्काराची घटना समोर आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बलात्काराची ही घटना चार महिन्यांपूर्वी घडली होती. मात्र पीडितेने नुकताच गुन्हा दाखल केला होता.