”जिचं नाही कोणी वाली ती PSI झाली ! एका अनाथ तरुणीच्या यशोगाथा …
"She who has no guardian became PSI!" Success story of an orphan girl...
यश संपादन करायला कुठलीही नातीगोती लागत नाहीत, ज्याचं कोणी नसतं ते ही यशस्वी होऊ शकतात. याचं हे उत्तम उदाहरण आहे एका अनाथ तरुणीनं पहिल्याच प्रयत्नात घवघवीत मिळवलं यश …आणि सर्वांच्या समोर ती एक आदर्श बनली सुंदरी एस बी असं या मुलीचं नाव आहे . या वयाच्या तिसऱ्या वर्षी आई-वडिलांचे छत्र हरवलं. त्यानंतर ती अनाथ म्हणूनच वाढली , मूळची लोणावळा येथील रहिवासी सुंदर आहे. मेहनतीच्या जोरावर आणि अभ्यासाच्या चिकाटीमुळे ती पहिल्याच प्रयत्नात पीएसआय झाली. वयाच्या तिसऱ्या वर्षापासून मळवली येथील संपर्क बालग्राम या संस्थेत ती राहिली, या संस्थेत राहून तिने बारावीपर्यंत शिक्षण पूर्ण केलं. संस्थेतून बाहेर पडल्यानंतर तीने आपल्या शिक्षणात थोडाही खंड पडू दिला नाही.
लोणावळ्याजवळील एका अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश घेतला. दरम्यान आर्थिक बाजू सांभाळण्यासाठी त्याच महाविद्यालयात नोकरी देखील केली. या महाविद्यालयातून कम्प्युटर इंजिनीअरिंग पूर्ण केल्यानंतर पीएसआय पदासाठी परीक्षा दिली, आणि पहिल्याच प्रयत्नात मोठं यश संपादन केले . महाराष्ट्र शासनाच्या अनाथ मुलांच्या कोट्यातून ए पी एस आई ची निवड करण्यात आली असून पोलिस उपअधीक्षक बनणारी सुंदरी ही पहिलीच मुलगी आहे . या सगळ्यात तिने सनाथ वेलफेयर फाउंडेशन या अनाथ मुलांसाठी काम करणाऱ्या संस्थेने मला मदत केल्या मुळेच यश संपादन करू शकले अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.
फक्त पीएसआय पदावर विराजमान नाही राहायचं, तर तिचे स्वप्न हे बाल महिला विकास विभागात अधिकारी व्हायच आहे. त्यासाठी पुन्हा जोमाने आणि जिद्दीने अभ्यास करायचा आहे आणि हे स्वप्न पूर्ण करायचे आहे . तिच्या यशाबद्दल सर्व स्तरातून तिचे भरभरून कौतुक केले जाते, सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या जात आहेत . या जगात जिच कोणीच नाहीच नाही ती देखील एक मोठ्या पदावर विराजमान होते.जिद्द न सोडता मोठी भरारी घेत हे यश संपादन करते त्यामुळे नक्कीच सुंदरी एस बी हिचा यांचा हा प्रवास आदर्शवत व प्रेरणादायी आहे