सिडकोच्या ‘त्या’ अधीक्षकाला पकडले रंगेहाथ !
अतिशय किरकोळ लाच घेताना चक्क एक अधीक्षकच रंगेहाथ पकडला आहे , सरकारी कामांमध्ये भ्रष्टाचार कमी व्हावा यासाठी अनेक कायदे आहेत, मात्र हा भ्रष्टाचार थांबायचं नाव घेत नाही. भला मोठा पगार असणारे अधिकारी वर्ग देखील अगदी काही हजार रुपयांसाठी लाज घेतात.सिडकोच्या अधीक्षक अभियंत्यासह एका निवृत्त सहाय्यक कार्यकारी अभियंत्याला १५ हजार रुपयांच्या लाचप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले.
नवीन पनवेल येथील सिडको नोडल कार्यालयाच्या संरचनात्मक दुरुस्ती केलेल्या कामाच्या बिलाच्या मंजुरीसाठी आवश्यक इंटर्नल क्वालिटी ऑडिट रिपोर्टवर सही करण्यासाठी मोहिले यांनी उपकंत्राटदार (तक्रारदार) यांच्याकडे १५ हजार रुपयांची मागणी केली होती. या लाचेबाबत तक्रारदाराने १५ सप्टेंबर रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नवी मुंबई कार्यालयात तक्रार केली. याबाबत एसीबीने पडताळणी केल्यानंतर मोहिले यांनी या लाचेबाबत निवृत्त सहाय्यक कार्यकारी अभियंता डेकाटे यांच्याशी बोलणे करण्याविषयी सांगितल्याचे स्पष्ट झाले.
पुन्हा एसीबीने या लाचेबाबत पडताळणी केली. यामध्ये डेकाटे यांनी मोहिले यांनी सांगितल्यानुसार १५ हजारांची लाच कंत्राटदाराकडे मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर एसीबीने शुक्रवारी सायंकाळी नवीन पनवेलमधील सिडको कार्यालयातच सापळा लावत १५ हजारांची लाच घेताना डेकाटे यांना पकडले. नंतर मोहिले यांना याच कार्यालयातून ताब्यात घेण्यात आले.
खांदेश्वर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.शासनाचा पगार असताना सुद्धा अशा पद्धतीने एखादं काम करण्यासाठी लाज घेणे आणि लाच देणं हा कायदेशीर गुन्हा आहे. त्यावरती कोठोरात कठोर कारवाई केली जाते. यामध्ये जो व्यक्ती लाच देतो तो देखील भ्रष्टाचारांला पेव फोडत असतो, तर जो लाज घेतो तो एक भ्रष्ट अधिकारी म्हणून संबोधला जातो. कुठल्याही ठिकाणी अशा घटना घडत असतील तर या घटनेची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला देऊन शासकीय कामातील भ्रष्टाचार कमी करण्यासाठी प्रत्येकाने मदत केली पाहिजे.