चरायला गेलेल्या बकर्यांवर वीज कोसळून १६ बकर्या जागीच मृत्यूमुखी; अवकाळी पावसाचा फटका.

नवरात्री मध्ये सध्या परतीचा पाऊस चालू आहे. त्यात मोठ्या प्रमाणात शेतकरी म्हणा किंवा इतर लोक सार्वजन या पावसाने वैतागले आहेत. सर्वच ठिकाण पावसाचा जोर कायम आहे. सातपुड्यातील खुर्चीमाळ परिसरातील डोंगरदरीत आज दुपारी ढगांचा गडगडाट सह वीजांच्या कडकडाटात जोरदार पाऊस झाला आहे. दरम्यान, डोंगर माथ्यावर काही बकऱ्या चरायला गेले असताना, चरायला गेलेल्या बकर्यांवर वीज कोसळून १६ बकर्या जागीच मृत्यूमुखी पडल्याची घटना घडली आहे.नशीब बलवत्तर म्हणून सुदैवाने बकर्या चरावयास गेलेली मुलगी व एक इसम थोडक्यात बचावले.

अक्कलकुवा तालुक्यात सध्या परतीच्या पावसाने काही ठिकाणी नुकसान केलेले आहे. खुर्चीमाळ येथील पिंकी सेगा नाईक व शांताराम काल्ला नाईक हे सकाळी खुर्चीमाळ येथील उंबराई पाड्यां कडील डोंगरावर बकर्यां चरावयास घेऊन गेले होते. त्यातच परतीच्या पावसाचा जोर वाढला.
आज दुपारी सुमारे दीड ते दोन वाजेच्या सुमारास उंबराईपाडा परिसरात ढगांचा गडगडाट व वीजांच्या कडकडाटासह मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला आहे. त्यामुळे पावसापासुन बचाव करण्यासाठी बकर्यांचा एक कळप डोंगरावरील पिंपळाच्या झाडाजवळ उभे होते.
यावेळी डोंगरदर्यात वीज बकर्यांवर कोसळली. त्यात खुर्चीमाळ येथील सायसिंग चांदया नाईक यांची १, काल्ला सुरजी नाईक यांच्या ५, चांदया टेंबर्या नाईक यांच्या ३ तर हांदया उंबर्या नाईक यांच्या ७ अशा एकुण १६ बकर्या जागीच मृत्यूमुखी पडल्या आहेत. सुदैवाने बकर्या चरावयास घेऊन जाणारी पिंकी नाईक ही मुलगी लांब अंतरावर होती. म्हणून ती थोडक्यात बचावली.