प्रेरणादायी : ६ वेळा नापास ७ व्या प्रयत्नात बनले IAS अधिकारी.

जर तुमच्याकडे जिद्द असेल चिकाटी असेल आणि ठरवलेले ध्येय पूर्ण करण्याची आकांक्षा असेल तर तुम्ही ठरवलेलं कोणतीही ध्येय पूर्ण करू शकता. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला यश प्रतिष्ठा पण मिळावी असं प्रत्येक युवकाचं एक स्वप्न असते आणि कुठलाही स्वप्न जर पूर्ण करायचा असेल तर त्यासाठी लागतात ते कठोर परिश्रम. आपल्याला जर मोठे ध्येय साध्य करायचं असेल तर परिश्रम देखील त्याचप्रमाणे करावी लागतात. आपण पाहतो की यूपीएससी परीक्षा ही सगळ्यात अवघड परीक्षा असते. पण जर तुम्ही प्रशासकीय अधिकारी बनण्याचे स्वप्न पाहत असाल तर मग तुम्हाला तुमच्या प्रयत्नांची पराकाष्टा केल्याशिवाय तुमच्याकडे पर्याय उरत नाही.
आपण पाहतो की स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांना यश मिळेलच असं नाही. यामध्ये काही युवकांना यश मिळतं, तर काहींच्या पदरी अपयश येते. पण आयुष्यात एखाद ध्येय पूर्ण करत असताना जर अपयश आलं तर याचा अर्थ असा होत नाही की, आपण प्रयत्न करणं त्या ठिकाणी थांबावं. कारण असं म्हटलं जातं की, अपयश हीच यशाची पहिली पायरी असते. आणि आपल्याला अशा अपयशांच्या पायऱ्या पार करून आपल्याला आपले यश मिळवायचं असतं. जर अपयश येत असेल तर ते येणार अपयश पदरात घेऊनही काही युवक पुन्हा पुन्हा प्रयत्न करत असतात. यामध्ये कठीण परिस्थितीमध्ये त्या परिस्थितीवर मात करून आय ए एस, आय पी एस अधिकारी होणारे जे युवक आहेत ते समाजासाठी नक्कीच प्रेरणादायी असतात अशीच एक बातमी आपण पाहणार आहोत.
ही बातमी आहे तमिळनाडू मधल्या जय गणेश यांची, जय गणेश यांची ही कहाणी अशीच प्रेरणादायी आहे. आयएएस अधिकारी होण्यापर्यंतचा जो प्रवास होता तो सांगायचं झालं तर अनेक अडचणींवर मात करून जय गणेश यांनी हे यश संपादन केला आहे. कधी काही वेटरची नोकरी करणारे आज हेच जय गणेश आयएएस अधिकारी झाले आहेत. तमिळनाडू राज्यातले आयएएस अधिकारी जय गणेश यांचा प्रवास खूप खडतर यांचे जीवनामध्ये अनेक अडचणी आल्या, पण त्यांनी त्या अडचणीवर मात करून मोठ्या आत्मविश्वासाने स्पर्धा परीक्षांमध्ये पास झाले. यामध्ये जे अधिकारी होण्याचे स्वप्न पाहत असतात या युवकांसाठी ही गोष्ट नक्कीच प्रेरणादायी असेल.
यामध्ये सांगायचं झालं तर जय गणेश यांनी यूपीएससीची परीक्षा सुमारे ६ वेळा दिली. कधी प्रीलियम मध्ये तर कधी अंतिम परीक्षेत ते अनुत्तीर्ण होत असत. वारंवार येणाऱ्या अपयशाने ते हातात झाले होते. त्यांना त्यांचा दैनंदिन खर्च भागवण्यासाठी एका हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करावे लागले. नोकरी करत असताना उरलेल्या वेळेत त्यांनी प्रामाणिकपणे अभ्यास केला. आणि यादरम्यान त्यांनी इंटेलिजन्स ब्युरो ची परीक्षा दिली. यामध्ये ते पास झाले परंतु त्यांच्यासमोर एक गंभीर समस्या निर्माण झाली होती नोकरीवर रुजू व्हावं की सातव्यांदा नागरी सेवा परीक्षा द्यावी. अशी अवस्था त्यांच्या मनाने केली होती पण आयएएस स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी इंटेलिजन्स ब्युरो चा नोकरीवर पाणी सोडलं.
तामिळनाडूमध्ये अंबर जवळ एक छोटं गाव आहे जय गणेश यांचे प्राथमिक शिक्षण त्या ठिकाणी झालं. यांना चार भावंड आहेत या भावंडांमध्ये ज्येष्ठ आहेत. ते अभ्यासामध्ये पहिल्यापासूनच हुशार होते. बारावीला त्यांना 91 टक्के गुण मिळवून ते पास झाले होते. बारावीनंतर त्यांनी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मध्ये प्रवेश मिळाला हे इन्स्टिट्यूट मध्ये त्यांनी मेकॅनिकल इंजिनिअरिंग पूर्ण केलं. इंजिनिअरिंग झाल्यानंतर जय गणेश यांना या कंपनीमध्ये नोकरी मिळाली. त्या ठिकाणी २५०० रुपये वेतन मिळालं, पण या नोकरीमध्ये त्यांचा मन लागत नव्हतं आणि मिळालेल्या पगारांमध्ये त्यांची घरातली खर्च भागणार नव्हते हे त्यांना समजत होतं. आणि यामुळे त्यांनी नागरी सेवा परीक्षा देण्याचा निर्णय घेऊन अभ्यासाला सुरुवात केली आणि परीक्षा देखील दिली.
सहा वेळा अपयशी होऊन त्यांनी सातव्यांदा नागरी सेवा परीक्षा दिली विशेष म्हणजे सातव्या वेळेस त्यांना यश मिळाले या परीक्षेमध्ये त्यांना 156 rank मिळाली. मेहनतीचे फळ मिळालं स्वतःवर विश्वास असेल तर नक्की संपन्न करता येतं. जय गणेश यांच्या वाटचालीवरून हे सगळे स्पष्ट होतं अशा प्रकारे जय गणेश यांचीही प्रेरणादायी कहाणी आपण पाहिली.