सलग ५ वेळा नापास पण माघार घेतली नाही, ६ व्या प्रयत्नात IAS अधिकारी.

नमिता शर्मा यांच्या यशाची ही यशस्वी कहाणी. कविता शर्मा यांनी इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशन इंजिनिअरिंगमध्ये पदवी प्राप्त केली होती. त्यानंतर त्यांनी दोन वर्ष आय बी आय सॉफ्टवेअर अभियंता म्हणून काम केलं.
असं म्हटलं जातं अपयश ही यशाची दुसरी पायरी असते. त्यामुळे अपयश आले तरी देखील कुणीही खचून जाऊ नये जास्त मेहनत केल्यास निश्चितच यश प्राप्त होता. तुम्ही जर मागे न हटता जिद्दीने प्रयत्न करत राहिलात तर एक दिवस यश तुमच्या अंगणात खेळेल. अशी अनेक उदाहरणे पाहिली असतील अपयशातून यशाचा मार्ग शोधणारी. त्यापैकी एक आहे ते म्हणजे आयएएस अधिकारी नमिता शर्मा यांचा इंजिनिअरिंगची पदवी प्राप्त केल्यानंतर त्यांनी दोन वर्ष सॉफ्टवेअर अभियंता म्हणून काम केला मात्र कामावरती खुश नव्हत्या यूपीएससीची तयारी करण्यासाठी त्यांना नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला आणि त्यानंतर त्या जेव्हा यूपीएससी मधून परीक्षा देऊ लागल्या तेव्हा सलग चार वेळा पूर्व परीक्षेत नापास झाल्या होता.
त्याच्या म्हणण्यानुसार परीक्षेसाठी खूप तयारी केली तर योग्य दिशेने केली होती त्या म्हणाल्या की, मी पदवी उत्तीर्ण झाल्यानंतर सर्व सरकारी परीक्षा द्यायला सुरुवात केली होती तर मानवी परीक्षेची माहिती न घेता यूपीएससी चे पहिले तीन प्रयत्न केले. असे असूनही नमिता यांनी आशा सोडली नव्हती. त्या मेहनत आणि अभ्यास करतच राहिला यादरम्यान त्यांनी आपल्या ध्येयाकडे वाटचाल केली त्यांनी ५ व्यांदा प्रयत्न केला तेव्हा पूर्व परीक्षेमध्ये पास झालेल्या मुलाखतीसाठी हजर राहिल्या मात्र थोडक्यात तिला थोड्या फरकाने अंतिम यादीत स्थान मिळवता आले नाही.
या निकालानंतर निराश झाल्या नाही उलट त्यांनी सकारात्मक मार्ग घेतला. या वेळी त्यांचा आत्मविश्वास वाढला आणि त्यानंतर 2018 मध्ये त्यांनी 145 अखिल भारतीय रँक मिळवली आणि आयएएस अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण केला.
नमिता विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणतात, यूपीएससीचे यश मिळवण्यासाठी चांगली रणनीती आणि वेळेचे व्यवस्थापन करणं महत्त्वाचा आहे. जर तो परीक्षेत उत्तीर्ण होऊ शकणार आहे तर त्याला वाईट किंवा निराश वाटू नये. फक्त रोज स्वतःला सुधारण्यावर ती लक्ष केंद्रित करावं तुम्ही तुमची स्पर्धक आहात प्रत्येक दिवस चांगला असतो. हा तुमचा प्रयत्न असायला हवा त्यावर विश्वास ठेवायला हवा पूर्वपरीक्षा ही प्रदीर्घ युद्धाची सुरुवात असते. आणि ती जर जिंकली तर पुढचं यश आहे ते निश्चितच तुम्हाला मिळू शकतो असे त्यांनी म्हटले आहे. मात्र जोपर्यंत आपले ध्येय गाठले जात नाही तोपर्यंत आपण प्रयत्न करण, मेहनत करणं हे सातत्य ठेवणं महत्त्वाचं असतं असा संदेश त्या देतात.