” ती पूजा मुलाच्या नशिबातून निघून जावी,अन..” झाडाला महिलेचा फोटो, काळी बाहुली आणि एक चिठ्ठी. पहा सविस्तर.

अंधश्रद्धा किती असावी याला काही मर्यादा असतात. अंधश्रद्धेच्या अनेक घटना या राज्यात घडत असतात. अंधश्रद्धेला खतपाणी घालणारे सर्वसामान्य कुटुंबातीलच असतात. यात महिलांचा नंबर अग्रेसर असतो. एक अशीच अंधश्रद्धेची बातमी पुढे पाहू
या अंधश्रद्धेतून नरबळी अशा अनेक घटना घडल्या मावळ तालुक्यातील बेलज गावात अत्यंत धक्कादायक आणि विचित्र प्रकार अंधश्रद्धेमुळे घडला. बाभळीच्या झाडाला एका फांदीला एका मुलीचा फोटो लावला. एक काळी बाहुली, लिंबू टाकलेले तसेच काळ्या धागेला एक चिठ्ठी बांधली आहे हा प्रकार उघड झाल्यानंतर परिसरात खळबळ माजली.
एकीकडे मनुष्याने विज्ञानाची कास धरली आकाशाला गवसली घातली आहे मात्र दुसरीकडे अजूनही अंधश्रद्धेच पेव फुटत आहे. मावळ तालुक्यातील कान्हे फाट्यापासून सहा किलोमीटर अंतरावरती असलेल्या टाकवे बुद्रुक जवळ बेलज एक छोटसं गाव आहे या गावाकडे जाणाऱ्या एका रस्त्यावरनं स्थानिक नागरिक प्रवास करत असताना त्याला बाभळीच्या झाडेला एका फांदीला महिलेचा फोटो एक काळी बाहुली होती एका लिंबा टांगलेले होतं काळ्या धाग्याला एक चिठ्ठी बांधलेली होती हा प्रकार पाहायला मिळाला.
याची माहिती त्वरित पोलीस पाटलांना आणि सरपंचांना देण्यात आली आणि त्यानंतर हा सगळा प्रकार उघड झाला. अगदी पाच ते सहा वर्षांपूर्वी तुंग किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या रस्त्याच्या कडेला असाच प्रकार उघडकीस आला होता. त्यावेळी त्या झाडाला एक नव्हे तर दहा ते बारा व्यक्तींचे फोटो हे टांगून त्यावरती लिंब टाचण्या ठोकण्यात आले होते. तसेच फोटोवर हळद गुलाल कुंकू आभिरही टाकण्यात आला होता.
काही मांत्रिक तांत्रिक स्वतःच पोट भरण्यासाठी नागरिकांना फसवतात. तांत्रिक मांत्रिक नागरिकांच्या आज्ञासांचा फायदा घेत असलेला त्रास आणि निर्माण होणाऱ्या अडचणी यामध्ये दैविकारण असल्याचे भासवणे या प्रकारे अंधश्रद्धेच फुटत आहे. त्यामधून मोठ्या प्रमाणात पैसे कमवले जातात. मात्र काही लोक भोंदूगिरीला बळी पडतात. विज्ञानाच्या जगात अंधश्रद्धेचे प्रकार घडत आहेत असा हा प्रकार स्थानिक नागरिकांच्या लक्षात आला.
आणि त्यानंतर या चिठ्ठीत नेमकं काय लिहिलं होतं तर, ” माझ्या मुलाच्या नशिबातून पूजा, सुनीता तिचा मावस भाऊ गेला पाहिजे. पूजा वेडीपीसी होऊन माझ्या मुलाच्या जीवनातून निघून गेली पाहिजे. तिचे भाऊ आई वडील मामा-मामी यांनी तिच्याबद्दलचा कुठलाही त्रास माझ्या मुलाला दिला नाही पाहिजे.” असा प्रकारे या चिठ्ठीत मध्ये लिहून लिहिण्यात आला होता. पोलीस या प्रकरणाचा छडा लावत आहे त्याचबरोबर यावरती जे दोषी असतील त्यांच्यावरती कडक कारवाई करण्याची मागणी या परिसरातील नागरिकाचा करत आहेत.