दुर्दैवी ! चिमुकलीला आईस्क्रीम खाण पडले महागात; पहा तिच्यासोबत दुकानात काय घडले.
आपल्या कुटुंबात जर लहान मुलं असतील तर तुम्हाला माहीत असेल त्यांचा हट्ट करणं कसा असतं. बऱ्याचदा ते आपल्याकडे हट्ट करतात आणि त्यामुळे त्यांचे हट्ट पुरवणे हे प्रत्येकाला आवडत असतं कारण बालपण हे पुन्हा पुन्हा नसतं. हट्ट हे आपण बालवयातच करू शकतो त्यामुळे बालकांचे हट्ट सर्वजण पुरवतात मात्र हट्ट पुरवणे एका व्यक्तीला फार महाग पडला. या हट्टामुळे त्याला आपल्या मुलीलाच गमवावे लागले.
लहान मुलांना बाहेरच्या खाऊच्या गोष्टी खूप आवडतात. बऱ्याचदा बाहेर गेल्यानंतर मला हे हवंय, ते हवय असा हट्ट आपल्या आई-बाबांकडे करतात. आणि आई-बाबा देखील आपल्या या चिमुकल्यांचा हट्ट पुरवत असतात. असाच हट्ट एका चिमुकलीने आपल्या बाबांकडे केला. बाबा मेडिकलमध्ये काही वस्तू घेत होते आणि त्याचवेळी या चिमुकलीने आईस्क्रीम खाण्यासाठी आईस्क्रीम घ्यायला गेली. ती पुन्हा परतलीच नाही.
नाशिकच्या सिडको येथील त्रिमूर्ती चौक उंटवाडी या ठिकाणी ही घटना घडली. या घटनेने सर्वांनाच धक्का बसला, आपल्या मुलीचा हट्ट पुरवणं या वडिलांना महागात पडला. कारण आईस्क्रीम खाण्यासाठी जेव्हा ती फ्रिजर कडे गेली होती तेव्हा तिला फ्रिजरचा शॉक लागला. त्यामध्ये तिचा मृत्यू झाला..
ही मुलगी आवडता फ्लेवर घेण्यासाठी धडपड सुरू होती, ही चिमुकली तिला कोणता फ्लेवर हवा हे सांगण्यासाठी फ्रीजर वर चढली. त्यामुळे तिला शॉक लागला, ती बेशुद्ध पडली तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं तिच्या कुटुंबीयांच्या पाया खालची जमीनच सरकली. अचानक अस विपरीत घडलं म्हणून हे कुटुंबासह परिसर शोकाकुल आहे.