मोठी बातमी : ” सरकार कोणाच असुद्या पण आमदार….”, पहा आ. निलेश लंके काय म्हणाले.
गेल्या अडीच वर्षापासून महाविकास आघाडी मधील आमदार निलेश लंके आपल्या सरकारच्या माध्यमातून पारनेर नगर मतदार संघामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विकास कामे मार्गी लावली आहेत. त्याचप्रमाणे सरकार बदलले असले तरी विकास कामांना निधी कमी पडणार नाही असं मत पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी मांडलं.
महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून अडीच वर्षापासून पारनेर नगर मतदारसंघांमध्ये मोठ्या प्रमाणावर विकास कामे मार्गी लावली गेली आहेत. आणि आता सरकार जरी बदलले असले तरी विकास कामांना निधी हा कमी पडणार नाही त्याचप्रमाणे पुढील 25 ते 30 वर्ष पारनेर मतदारसंघाचा आमदार हा मीच असणार आहे. असा विश्वास आमदार निलेश लंके यांनी व्यक्त केला.
गणेश उत्सव तसेच वनकुटे चे लोकनियुक्त सरपंच वकील राहुल झावरे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमांमध्ये आमदार निलेश लंके हे बोलत होते. धनगर बांधवांनी पारंपारिक घोंगडी, फेटा, काठी हे सर्व देऊन आमदार लंके यांचा सत्कार केला. गुरुदत्त पतसंस्थेचे अध्यक्ष झावरे व इतर ग्रामस्थ त्या ठिकाणी उपस्थित होते.
यावेळी बोलताना निलेश लंके म्हणाले की, खारे कर्जुने लष्करी सराव क्षेत्रासाठी ( के.के. रेंज ) वनकुटे परिसरातील जमीन अधिग्रहित करण्याची अधिसूचना संरक्षण विभागाने काढली होती. सदरील परिसरावर हे एक मोठी संकट होते. पण त्यावेळी आपण एक इंचही जमीन जाऊ देणार नाही, तसेच झाले तर रणगाड्यासमोर आडवे पडू असा शब्द निलेश लंके यांनी दिला होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी संरक्षण मंत्र्यांकडून हा निर्णय फिरवून घेतला.
दुसरीकडे मात्र काही मंडळी आता हा निर्णय बदलला जाणार नाही न्यायालयात जाऊन आपण जमिनीचा जास्त मोबदला मिळवून देऊ असं सांगून आपल्या बांधवांकडून अर्ज भरून घेत होते. मात्र शरद पवार यांनी या सगळ्यांमध्ये लक्ष घालून हे संकट दूर गेले. पुढील काळातही मतदारसंघांमधील कोणावरही संकट आले तर ते दूर करण्यासाठी मी एक लोकप्रतिनिधी म्हणून पुढे असेल. असं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं.
त्याचप्रमाणे वनकुटे गावासाठी आत्तापर्यंत 25 कोटी रुपयांचा निधी आपण दिला आहे. पाणीपुरवठा योजना निधी लवकरच प्राप्त होईल. दुर्गम भागातील आदिवासी बांधवांसाठी काम करण्यात समाधान असल्याचे निलेश लंके यांनी यावेळी नमूद केले. त्याचप्रमाणे सरपंच राहुल झावरे यांनी वनकुटे व परिसराच्या विकासासाठी परिश्रम घेतले आहेत. त्यामुळेच अडीच वर्षांमध्ये 25 कोटींचा निधी तुमच्या गावाला आला आहे. लवकरच झावरे यांच्या वाढदिवसाची भेट वन कुठे ग्रामस्थांना देणार असल्याचे देखील आमदार निलेश लंके यांनी यावेळी बोलताना सांगितलं.