अरे बाप रे ! चक्क PSI ने मागितले हरणाचे मांस; वनविभाग कर्मचाऱ्यांनी झडती घेताच थैलीमध्ये मिळाले असे काही. पाहा सविस्तर.
आज काय कोण काय करेल सांगता येत नाही. त्याचप्रमाणे सोशल मीडियावर कोणती बातमी कधी व्हायरल होईल हे देखील सांगता येत नाही. ही अकोला या ठिकाणी घडली आहे. अकोला वन विभागाच्या हद्दीमध्ये शेत शिवार परिसरात हरणाचं मांस घेऊन जात असताना दोन जणांना पकडल.
तसेच त्यांना अटक झाली पण आता वन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून धक्कादायक अशी माहिती समोर येत आहे. अटक केलेले आरोपी यांनी असं सांगितलं की, ते एका पोलिस अधिकाऱ्यासाठी हरणाचा मांस घेऊन जात होते. दरम्यान तो पोलीस अधिकारी अमरावती येथे असल्याने ते त्या ठिकाणी पोहोचू शकले नाही.
त्यामुळे हरणाचा मांस घेण्यासाठी या ठिकाणी दुसरा पोलीस कर्मचारी ठरलेल्या पत्त्यावर आला. पण त्या ठिकाणी वन विभागाने यांच्यावर आधीच कारवाई केलेली होती. हरणाचा मांस घेऊन जाणाऱ्या दोघांना पकडले असून वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना पाहून त्या पोलिसांनी घटनास्थळावरून पळ काढला.
आरोपी नेमकं कोणत्या पोलीस अधिकाऱ्यासाठी हे मास घेऊन जात होता ? हरणाचा मांस घेण्यासाठी आलेला पोलीस कोण ? या सर्व प्रकरणाचा तपास वन विभाग करणार का ? हाही प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. या संदर्भामध्ये पोलिसांकडे विचारणा करण्यात आली. संबंधित पोलिसांची विचारणा करण्यात येईल असे पोलिसांनी कळवले. आता हरणाचं मांस मागवणारा पोलीस अधिकारी समोर येईल का असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला जात आहे.
अकोला वनविभाग अंतर्गत येत असलेल्या ग्राम केळीवेळी च्या जवळपास पांढरी फाट्याजवळ काही शिकाऱ्यांकडून हरणाचा मांस विकत घेऊन दोन जण जात असल्याची माहिती अकोल्याचे वनरक्षक यांना मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारावर त्यांनी या ठिकाणी कारवाई करून दोघांना अटक केला आहे. दरम्यान वन विभागाच्या सूत्रानुसार यातील एका आरोपीने आपण पीएसआय आहे का असं विचारलं.
असं विचारल्यानंतर वन विभागाने म्हटले की, कोण पीएसआय पाहिजे ? आणि तुझ्याकडे असलेल्या थैलीमध्ये काय आहे ? याबाबत चौकशी केली असता व त्या दोघांची झडती घेतली असता त्यांच्याकडे हरणाचं तब्बल पाच किलो मास आढळून आलं. संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू आहे हरणाचं मांस कुठून आले ? कुणासाठी नेले जात होते ? याचा तपास केला जाणार असून तपासा दरम्यान जे काही समोर येईल त्यानुसार निश्चितच योग्य अशी कारवाई वनविभागाकडून केली जाईल अशी माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी ओवे यांनी दिली.