दुथडी भरून वाहत होती नदी; त्यात शिक्षकाने घेतली उडी, कारण ऐकून विश्वास ठेवणार नाही कोणी. पाहा सविस्तर !
सध्या पावसाचे दिवस मान चालू आहेत आणि त्यातच आपण पाहतो की, वाढत्या पावसाच्या प्रमाणामुळे कित्येक लोकांचे संसार ही वाहून गेले तर कित्येकांची संसार उघड्यावर आले. तसेच कित्येक लोकांच्या घरांमध्ये पाणी घुसले आहे. हे सर्व चालू असताना एक घटना समोर येते आहे. गोड पिंपरीतील शिवाजी चौकामध्ये रहिवासी असलेले रामचंद्र उराडे हे काल सकाळपासून बेपत्ता होते.
कुटुंबीयांनी यासंदर्भात तक्रार देखील दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी शोध मोहीम चालू केली असता, नदीपात्रालगत उराडे यांचा मृतदेह आढळून आला. रामचंद्र उराडे गेल्या काही दिवसांपासून मधुमेहासारख्या आजारामुळे त्रस्त होते.
यामध्ये मिळालेली माहिती अशी की, जिल्हा परिषद शाळा विहीरगाव येथे कार्यरत असलेले रामचंद्र उराडे वय वर्ष 56 या शिक्षकाने काल सकाळच्या सुमारास वैनगंगा नदी पात्रात उडी घेत जीवन यात्रा संपवली आहे.
शुक्रवारच्या सकाळी आष्टी वैनगंगा पुलावरून एका इसमास उडी मारत असताना काही कामगारांनी बघितलं होतं.
त्यांनी वाचवण्याचा प्रयत्न देखील केला होता, पण नदीपात्र हे तुडुंब असल्याने त्यांना अपयश आलं. उराडे यांनी नेमकं आत्महत्या का केली, याचं कारण अद्यापही समोर आलेलं नाही. नेमकी त्यांनी हा निर्णय का घेतला याबाबतची चौकशी, तपास सध्या पोलीस करत आहेत. पण जे मुलांना घडविण्याचे त्यांचं भवितव्य कसे असावे याबद्दलचे धडे देणारे शिक्षक यांनीच जर अशा प्रकारच्या आत्महत्या केल्या, तर विद्यार्थी वर्गाने अशा शिक्षकांकडे काय म्हणून पाहायचे. उराडे कुटुंबावर रामचंद्र यांच्या जाण्याने दुःखाचा डोंगर कोसळला आहे.