नगर ब्रेकिंग : पारनेर मध्ये भरदिवसा तिघांकडून गोळीबार; पहा बातमी सविस्तर.

पारनेर मध्ये गुन्हेगारच प्रमाण वाढू लागलं आहे , दिवसा ढवळ्या खून मारामारी हे सत्र वाढत आहे. पारनेर तालुक्यातील मांडओहोळ ते म्हसोबा झाप रोडवर सरकारी कंत्राटदार स्वप्निल जयसिंग आग्रे (वय २५ रा. म्हसोबा झाप) यांच्यावर तिघांचा गोळीबार. दुपारी अडीच वाजता सदरील घटना घडली आहे. जखमी आग्रे यांच्यावर उपचार सुरू आहेत, तसेच दुचाकीवरून आलेले दोघे हल्लेखोर पसार झाले आहेत. या हल्यामागील कारण अजूनही अस्पष्ट आहे. या घटनेबाबत पारनेर पोलीस सखोल तपास करत आहेत. भर रस्त्यात गोळीबार झाल्या मुळे या परिसरात भीतीच वातावरण आहे.
हल्ला करून हे तिघेजण फरार होण्याच्या बेतात असताना तीन पैकी २ जणांना वारणवाडी सब स्टेशन जवळ पिस्तूल सहित वारणवाडी ग्रामस्थांनी पकडुन पारनेर पोलिसांच्या हवाली केले आहे. तर त्या परप्रांतीय हल्लेखोरांत एक जण फरार झाला आहे. ही घटना मंगळवारी दुपारी २.३० वाजता घडली असून हा शासकीय ठेकेदार आपल्या चार चाकी मधून आपल्या घरी चालले असताना दुचाकीवरून आपली तोंडे बांधून आलेल्या तिघांनी त्याच्यावर तीन राऊंड फायर केले.
त्यापैकी दोन गोळ्या उजव्या बाजूला त्याला छातीत लागल्या असून हल्ला करून ते हल्लेखोर दुचाकीवरून फरार झाले आहे. हे हल्लेखोर परप्रांतीय असून आर्थिक व्यवहारातूनच हल्ला झाला असण्याची शक्यता आता व्यक्त होऊ लागली आहे. पारनेर तालुक्यातील मांड ओहोळ – म्हसोबा झाप रोडवर स्वप्निल जयसिंग आग्रे वय २५ राहणार – म्हसोबा झाप या तरुण शासकीय ठेकेदार म्हसोबा झाप कडे चालला असताना मंगळवारी दुपारी २.३० वाजता तीन अज्ञात इसमांकडुंन गोळीबार करण्यात आला आहे.
या गोळीबारात तो गंभीर जखमी झाला आहे. गोळीबार झाल्यानंतर त्याला टाकळी ढोकेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार साठी दाखल करण्यात आले होते, परंतु गोळीबारात गंभीर जखमी झाल्याने त्याला पुढील उपचारासाठी नगर येथील शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. मात्र गोळीबार करणारे तीन राऊंड फायर करून फरार झाले असून दोन गोळ्या उजव्या छातीत लागल्याने तो गंभीर जखमी झाला आहे. तर दुसरीकडे नेमकी ही घटना कशामुळे घडली याचा तपास पारनेर पोलिस करत आहेत. गोळीबार करणारे तिघे जण दुचाकीवरून मांडव्याच्या दिशेने फरार झाले असून ठेकेदारी तुन हा प्रकार घडला तर नाही यादृष्टीने पोलीस तपास सुरू केला आहे.