पोलीस अंमलदारचा हवालदाराला जाच; आत्महत्या करणार असा Video केला वरिष्ठांना शेअर पहा सविस्तर.

पोलिस कॉन्स्टेबलने आत्महत्या करणार असल्याची कैफियत मांडत तो व्हिडिओ
प्रत्येक पोलिस ठाण्यांमध्ये कमी-अधिक प्रमाणात वरिष्ठ पोलिस अधिकारी व अंमलदाराकडून मर्जीतील कर्मचाऱ्यांची बाजू घेत काही कर्मचाऱ्यांना जाणीवपूर्वक त्रास दिला जात असल्याचे सातत्याने बोलले जाते.शहर पोलिस आयुक्तालय हद्दीतील एका पोलिस ठाण्यातील अंमलदाराकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून पोलिस कॉन्स्टेबलने आत्महत्या करणार असल्याची कैफियत मांडत तो व्हिडिओच वरिष्ठ अधिकाऱ्यांना शेअर केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे.
मध्यरात्री घडलेल्या या प्रकारामुळे पोलिस अधिकाऱ्यांची झोपच उडाली आणि संबंधित पोलिस कॉन्स्टेबलची भेट घेत त्याची समजूत घातल्याचे समजते.त्याच्या मोबाईलमध्ये एक व्हिडिओ करून वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या मोबाईलवर शेअर केला. या व्हिडिओमध्ये कॉन्स्टेबलने पोलिस ठाण्याचे हजेरी मास्तर तथा अंमलदाराकडून जाणीवपूर्वक त्रास दिल्याचे म्हटले आहे.
तसेच या सततच्या त्रासाला कंटाळून आपण आत्महत्या करीत असल्याचेही म्हटले आहे. या शिवाय कॉन्स्टेबल होणाऱ्या त्रासाचीही माहिती देत जगण्याचीच इच्छा राहिली नसल्याचे सारखा म्हणतो आहे. डोळ्यावर गॉगल लावून या तरुण कॉन्स्टेबलने तयार केलेला व्हिडिओ आयुक्तालयाच्या एका ग्रुपसह काही वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या ग्रुपवरही शेअर केला आहे.