सोने लुटून घरी आली; आणि बिछान्यावर पहा तिच्यासोबत काय घडल बातमीत सविस्तर.
दसऱ्याला सोने लुटून घरी पोहोचलेल्या 13 वर्षीय वैष्णवी भुरवले हिचा बिछान्यात सापाने दंश केल्याने मृत्यू झाला. ही घटना यवतमाळ जिल्ह्यातील ढाकणी गावातील आहे. ती 7वी ची विद्यार्थिनी होती.
वैष्णवीच्या घराजवळ खूप कचरा पडलेला आहे. या कचऱ्यात कीटक- झुरळ-बेडूक वगैरे आहेत. याठिकाणाहूनच सापाने घरात प्रवेश केला असेल, असा अंदाज लावण्यात येत आहे. सर्पदंशानंतर वैष्णवी जोरात ओरडली. यानंतर तिच्या आई वडिलांना समजले की तिला सर्पदंश झाला आहे. सर्पदंश दिसत होता. यामुळे तिला लगचेच तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.
मात्र, दुर्दैवाने उपचाराआधीच तिचा मृत्यू झाला. दसऱ्याच्या दिवशी घडलेल्या या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. तर पोलिसांनी याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.
सर्पदंश झाल्यास नागरिकांनी घाबरून जाऊ नये. संबंधित व्यक्तीला एकाच ठिकाणी बसवून तात्काळ सरकारी रुग्णालयात प्राथमिक उपचारासाठी दाखल करावे. यामुळे रुग्णाचा मृत्यूचा धोका टाळता येऊ शकतो.”