सरकारी कार्यक्रमात महिलेचा नको तसा डान्स, उपमुख्यमंत्रीच्या नागपूरातील Video होतोय Viral.

उपमुख्यमंत्रीच्या जिल्ह्यात हे काय घडतय , समाज प्रबोधन च्या कार्क्रमला गालबोट लागल आहे,पार शिवणी नगरपंचायातने हा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात प्रबोधनाऐवजी चक्कनको तसा डान्स करण्यात आले असा आरोप केला जातोय, नागपूर जिल्ह्यातील पारशिवणी नगरपंचायतीनं लोकांसाठी एका समाजप्रबोधन कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमात राजकिय मंडळींसोबत काही सरकारी अधिकारी देखील उपस्थित होते.
मात्र या कार्यक्रमाच प्रबोधनाऐवजी चक्क नको तसा डान्स करण्यात आले असा आरोप केला जातोय. या कार्यक्रमातील एक व्हिडीओ सध्या इंटरनेटवर व्हायरल होतोय. हा व्हिडीओ पाहून नेटकरी प्रचंड टीका करत आहेत. या लोकांवर कायदेशीर कारवाई करा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
पारशिवणी नगरपंचायतीने समाजप्रबोधन कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. सुरुवातीला या कार्यक्रमात पथनाट्याद्वारे प्रमोधनात्मक संदेश देण्यात आला. त्यानंतर प्रेक्षकांच्या मनोरंजासाठी डान्स आणि संगीताचा कार्यक्रम करण्यात आला. पण कार्यक्रमात नृत्य सादर करणारी नृत्यांगणा चक्क नको तसा हावभाव करू लागली. प्रेक्षक देखील तिच्यासोबत नको तसा डान्स करत होते.
या कार्यक्रमाचा व्हिडीओ @PravinSindhu या ट्विटर अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून त्यावर नेटकरी विविध प्रकारच्या प्रतिक्रिया देत आहेत. हा व्हिडीओ पाहून काही नेटकरी प्रचंड भडकले आहेत. सोबतच आयोजकांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी देखील ते करतायेत.