विदर्भ

भयानक ! विचित्र अपघातात सेवानिवृत्त पोलीस अधिकारी ठार, दोन जण गंभीर पहा सविस्तर.

मालवाहू मिनी ट्रकचा चालक अंकुश केने याने त्याच्या ताब्यातील वाहन निष्काळजीपणे चालवून विरुद्ध दिशेने देवळीकडे जात होता. दरम्यान, देवळीकडून वर्ध्याकडे येणाऱ्या सोळा चाकी मालवाहू ट्रक व कार या दोन्ही गाड्यांसमोर मिनी मालवाहू ट्रक आल्याने दोन्ही वाहने अनियंत्रित झाली. यात मिनी ट्रकवर जाऊन धडकल्या. या अपघातात १६ चाकी ट्रक आणि कार रस्त्याकडेला खोल खाईत जाऊन आदळल्या. कारचालक सुधाकर चव्हाण यांचा मृत्यू झाला. तर १६ चाकी चालक रामेश्वर आणि मिनी मालवाहू ट्रकचालक अंकुश केने हे दोघे गंभीर जखमी झाले.

अपघातच सत्र दिवसेंदिवस वाढत आहे , पोलीस दलातील अधिकारी याची शिकार होत आहेत, एक पोलीस अधिकारी ठार ,तर दोन जण गंभीर जखमी झाला आहे. रस्‍त्‍यावर विरुद्ध दिशेने येणाऱ्या मालवाहू वाहनावर समोरून येणाऱ्या दोन चारचाकी धडकल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात भंडारा येथील रहिवासी सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्याचा जागीच मृत्यू झाला.

तर दोन्ही वाहनांचे चालक गंभीर जखमी झाले. सदर अपघात देवळी ते वर्धा मार्गावर सकाळी कृषी विज्ञान केंद्रजवळ झाला. सुधाकर चव्हाण (रा. भंडारा) असे मृत सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्याचे नाव आहे. तर मालवाहू ट्रकचालक अंकुश केने आणि १६ चाकी चालक रामेश्वर (रा. राजनांदगाव, छत्तीसगड) अशी जखमींची नावे आहे. दोन्ही जखमींवर सावंगी येथील रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती सावंगी पोलिसांनी दिली आहे.

वेगवान असणाऱ्या वाहनच नियंत्रण सुटल हा अनर्थ घडला , वेगावर नियंत्रण असत तर ही दुर्घटना घडली नसती.पोलीस दलातील अधिकाऱ्याच्या जाण्याने सर्वजन हळहळ व्यक्त करत आहेत.

News Mall18

It is a News Channel where you can get all types of news like we have generated some category like Breaking News, Story News, Live News, Political News, Social news, Impact News Explainer Videos, Digital News, Viral News, Advertise News, Interviews, Promotions, Presentation, Entertainment, Related Movie Trailers, PRO, Awards Etc.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Share this news instead of copying!