इतर पक्ष

स्वतःच्या बुडाखाली अंधार ठेवून, दुसऱ्यावर चिखलफेक करणाऱ्या सुजय विखेंची झाली पोलखोल.

पारनेरच्या सुपुत्राला आणि संपूर्ण तालुक्याला बदनाम करण्याचा “डर्टी गेम” अखेर विखेंवरच उलटल्याची चर्चा सध्या जोरात आहे. काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्याच्या घरावर दगड मारू नये, हे विखे पाटील विसरलेत का, असा सवाल उपस्थित होत असून खोट्या बातमीच्या आधारे चिखलफेक करणाऱ्यांनी आधी स्वतःचे तोंड आरशात पाहावे, असा संतप्त सूर जनतेतून उमटतोय.

सार्वजनिक आयुष्यात शेकडो लोक भेटतात, फोटो काढतात आणि प्रत्येकाची पार्श्वभूमी माहिती असतेच असे नाही. पण जर फक्त फोटोच्या आधारे ‘ड्रग्ज कनेक्शन’ जोडायचे असेल, तर मग विखे पाटील यांच्या जवळच्या फोटोंवर काय उत्तर आहे, असा थेट सवाल केला जातोय. ड्रग्ज माफिया म्हणून गुन्हा दाखल असलेल्या भूषण उर्फ ऋषी चत्तरसोबत सुजय विखे पाटील आणि काशीनाथ दाते यांचे जवळीकीचे फोटो काय सांगतात, असा मुद्दा उपस्थित करून “फोटोंवरूनच गुन्हेगार ठरवायचे असतील, तर मग सुजय विखेंना ‘ड्रग्ज माफिया’ म्हणायला काय हरकत?” असा पलटवार केला जातोय.

याचबरोबर, विखे पाटील बालवाडीतल्या पोरांसारखे खोटे उद्योग करून निलेश लंकेंची प्रतिमा मलीन करू शकत नाहीत, असेही ठामपणे सांगितले जात आहे. जिल्ह्याला चांगले ठाऊक आहे की ज्या पोलीस कर्मचाऱ्याचा उल्लेख केला जातोय, त्याला आशीर्वाद कोणाचा होता आणि नियुक्ती कोणाच्या शिफारसीने झाली होती, हे सत्य जनतेसमोर स्पष्ट आहे, असा आरोपही या प्रतिक्रियेतून पुढे येतोय.

दरम्यान, “वैयक्तिक चिखलफेक न करता विकासाच्या मुद्द्यावर बोला—जागा तुमची, वेळ तुमची… निलेश लंके समोरासमोर जाहीर चर्चेला येतील,” असे खुले आव्हान देण्यात आले आहे. हिंमत असेल तर मैदानात या, वाकड्या वाटांनी शिखंडीसारखे वार करू नका, असा इशाराही देत अहिल्यानगर दक्षिण आणि पारनेरची सुज्ञ, स्वाभिमानी जनता अशा फसव्या राजकारणाला भीक घालत नाही—वेळ आल्यावर जनताच तुमचा “माज” उतरवल्याशिवाय राहणार नाही, असा कडक संदेश देण्यात आला आहे.

News Mall18

It is a News Channel where you can get all types of news like we have generated some category like Breaking News, Story News, Live News, Political News, Social news, Impact News Explainer Videos, Digital News, Viral News, Advertise News, Interviews, Promotions, Presentation, Entertainment, Related Movie Trailers, PRO, Awards Etc.

Related Articles

Back to top button

Share this news instead of copying!