महाराष्ट्र

पोल्ट्री फॉर्ममध्ये व्यावसायिक तरुणाने गळफास घेतला, गावचा सरपंचाने उचलले टोकाचे पाऊल.

व्यावसायिक तरुणाने आत्महत्या केली , त्यामुळे परिसरात खळबळ माजली आहे , या तरुणाने एवढ मोठ टोकच पावलं उचल आहे , राजकारणात ही हा तरुण सक्रीय होता ,मात्र या घटनेनंतर तणावाच वातावरण आहे .सातारा तालुक्यातील बोरखळ गावच्या सरपंचांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे.

अमोल नथुराम नलावडे असे या तरुण सरपंचाचे नाव आहे. अमोल नलावडे हे बोरखळ गावचे सरपंच त्यांचा पोल्ट्रीफॉर्म चा व्यवसाय गावापासून जवळच जरंडेश्वर रोडवर त्यांचा पोल्ट्रीफॉर्म आहे. 11 ऑक्टोबर रोजी साधारण 12 ते 1 च्या सुमारास वडील नथुराम नलावडे हे पोल्ट्रीफॉर्म कडे गेले असत्या पोल्ट्री फॉर्ममध्ये मुलगा अमोल नलावडे हा गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला.

याबाबत त्यांनी गावकऱ्यांना सांगितले असता नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली दुपारी साधारण दोन वाजता पोलिसांनी शव उत्तरीय तपासणीसाठी सातारा जिल्हा रुग्णालय येथे दाखल केले.अमोल नलावडे हे अत्यंत हुशार आणि कर्तबगार सरपंच म्हणून परिसरात परिचयाचे होते.

त्यांनी आपला व्यवसाय आणि नावाचा ठसा उमटविला होता त्यांनी हे टोकाचे पाऊल का उचलले याबाबत परिसरात चर्चा सुरू असून नेमके कारण अद्यापही समोर आलेले नाही याबाबत सातारा तालुका पोलीस स्टेशन पुढील तपास करत आहे.

News Mall18

It is a News Channel where you can get all types of news like we have generated some category like Breaking News, Story News, Live News, Political News, Social news, Impact News Explainer Videos, Digital News, Viral News, Advertise News, Interviews, Promotions, Presentation, Entertainment, Related Movie Trailers, PRO, Awards Etc.

Related Articles

Back to top button

Share this news instead of copying!