सिंहगड एक्सप्रेसमध्ये प्रचंड गर्दीत जागेवरुन तुंबळ हाणामारी, घटनेचा Shocking Video..
ठाणे मध्ये ट्रेन मद्ये महिलांच्या हाणामारीचा व्हिडियो मोठ्या प्रमाणात viral झाला होता . असाच दुसरा व्हिडियो सोशल मिडियावर शेयर होत आहे , अश्या गोष्टी नेहमी घडत असतात.ट्रेनमध्ये बसण्यासाठी जागा पकडण्यावरुन काहीतरी वाद झाला आणि पुढे याचंच रुपांतर हाणामारीत झालं. पासधारक आणि सामान्य रेल्वे प्रवासी यांच्यात नेहमी अशा चकमकी होतात.
परंतु आज सिंहगड एक्स्प्रेस चिंचवड स्टेशनवर येताच रेल्वेच्या डब्यात जागा पकडण्यासाठी तुंबळ हाणामारी झाली. या घटनेचा व्हिडिओ तिथेच असलेल्या काही प्रवाशांनी आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला आहे. व्हिडिओमध्ये दिसतं, की ट्रेनमध्ये प्रचंड गर्दी आहे. अनेक लोक उभा राहूनच प्रवास करत आहेत. इतक्यात जागा पकडण्यावरुन दोघांमध्ये काहीतरी वाद झाला
मुंबई-पुणे दोन शहरांदरम्यान धावणाऱ्या सिंहगड एक्स्प्रेस ट्रेनमध्ये प्रचंड गर्दी होत आहे. त्यामुळे एक्सप्रेसमध्ये बसायला जागा मिळत नसल्याने अनेकदा वाद झाल्याचं पाहायला मिळतं. बुधवारी सकाळी सिंहगड एक्स्प्रेसच्या बोगीत चाकरमानी यांच्यात जागेवरून तुफान हाणामारी बघायला मिळाली. सहसा गुण्यागोविंदाने पुणे मुंबई रेल प्रवास करणारे चाकरमानी आज भांडणाच्या मूडमध्ये दिसून आले.
हा वाद इतका वाढला की गर्दीमध्येच एकमेकांना अक्षरशः खाली पाडत तिथेच हाणामारी सुरू झाली. अखेर इतर प्रवाशांनी मध्यस्थी करत ही भांडणं सोडवली आणि प्रकरण शांत झालं. यापूर्वी अनेकवेळा पिंपरी-चिंचवड रेल प्रवासी संघटनेचे अध्यक्ष भाई जान मुलानी यांनी रेल्वे प्रशासनास अनेक निवेदने दिली आहेत. पिंपरीची वेगळी बोगी आणि चिंचवडसाठी वेगळी बोगी करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. मात्र प्रवासी संघटनेच्या मागणीला रेल्वे प्रशासनाकडून केराची टोपली दाखवण्यात आली आहे. अशातच आता आणखी एक घटना समोर आल्याने प्रवाशांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.