सिव्हिल’मध्ये नोकरी लाऊन देते अस म्हणंत सख्ख्या बहिणींनी लुबाडले १६ तरुणांना पहा बातमी सविस्तर.
सरकारी नोकरीच अनेकांना वेड असत , मग सरकारी नोकरी आमिषा पोटी अनेक फसवणुकीचा गुन्हे घडतात . असाच एक धक्कादायक प्रकार घडला आहे .वैद्यकीय प्रमाणपत्र प्रकरणानंतर जिल्हा शासकीय रुग्णालय पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.‘सिव्हिल’मध्ये नोकरी लाऊन देते , असे आमिष देत तरुणांना गंडा घालण्याचा प्रताप जुन्या नाशिकमधील दोन सख्ख्या बहिणींनी केल्याचे उघड झाले आहे.
आतापर्यंत त्यांनी १६ तरुणांना लुबाडले आहे. जिल्हा रुग्णालयात कायमस्वरुपी आरोग्य सेवकाची नोकरी देण्याचे सांगून तरुणांकडून लाखो रुपये त्यांनी उकळले आहेत. याप्रकरणी भद्रकाली पोलिसांत दोन्ही संशयित बहिणींवर गुन्हा दाखल झाला आहे.खडकाळी परिसरातील रहिवासी अरबाज सलिम खान या तरुणाने भद्रकाली पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार संशयित फरीन जुल्फेकार शेख आणि जकीय जुल्फेकार शेख यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.
या दोघी बहिणी जिल्हा रुग्णालयात कामाला नाही. मात्र, अल्पावधीत जास्त पैसे कमविण्यासाठी त्यांनी आजूबाजूच्या बेरोजगार तरुणांना हेरले. त्यांना सिव्हिलमध्ये कायमस्वरुपी नोकरी लावून देतो. आमची तिथे वरिष्ठांपर्यंत ओळख आहे, असे भासवले.
काहींना सिव्हिलमध्ये नेले. तिथे वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या पोशाखात फिरून कुठे काय काम चालते, हे दाखवले. याप्रमाणे विश्वास संपादन करून तक्रारदार खान यांच्याकडून १ लाख २८ हजार रुपये घेतले. मात्र, त्यांना कोणतीही नोकरी मिळाली नाही. असाच प्रकार आणखी पंधरा तरुणांसोबत घडल्याचे समजते. त्यानुसार भद्रकाली पोलिस पुढील तपास करीत आहेत.